spot_img
spot_img
spot_img
spot_img

सिद्धेश्वर देवस्थान प्रकरणात विश्वस्तांना क्लीन चिट नाही; ट्रस्टवर कडक देखरेखीचे आदेश

सिद्धेश्वर देवस्थान प्रकरणात विश्वस्तांना क्लीन चिट नाही; ट्रस्टवर कडक देखरेखीचे आदेश

 

सोलापूर : “सिद्धेश्वर देवस्थान विश्वस्त बरखास्तीची याचिका फेटाळली” अशा आशयाने प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे मत अर्जदार संजय भिमाशंकर थोबडे यांनी व्यक्त केले आहे.

 

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायद्याच्या कलम 41-D अंतर्गत दाखल केलेला अर्ज अंतिम आदेशाने फेटाळण्यात आला असला, तरी याचा अर्थ विश्वस्तांना क्लीन चिट मिळाली किंवा ट्रस्टच्या कारभारावर कोणतीही शंका नाही, असा निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

न्यायाधिकरणाच्या निर्णयात ट्रस्टविरुद्ध गुन्हेगारी व नियामक कार्यवाही प्रलंबित असल्याचे, बदल अहवाल अनेक वर्षांपासून रखडले असल्याचे तसेच कलम 50-A अंतर्गत योजना अर्ज सादर न केल्याची नोंद आहे. ट्रस्टच्या प्रशासनात अनिश्चितता व जोखमीची परिस्थिती असल्याचे निरीक्षणही निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

 

याच कारणांमुळे अर्ज फेटाळतानाही न्यायाधिकरणाने विश्वस्तांना कोणतेही महत्त्वाचे निर्णय न घेण्याचे आदेश दिले असून, निरीक्षकाची नियुक्ती, दरमहा अहवाल सादर करणे व सहाय्यक धर्मादाय आयुक्तांच्या विशेष देखरेखीचे निर्देश दिले आहेत. हे आदेश ट्रस्टच्या हितासाठी संरक्षणात्मक व सुधारात्मक स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

निर्णयात कुठेही सर्व बांधकामे कायदेशीर असल्याचे किंवा महानगरपालिकेचा दंड गौण असल्याचे नमूद नाही. अनधिकृत कामे, दंड व नियामक अडचणी यांची नोंद निर्णयात आहे. तसेच अर्जदारावरील वैयक्तिक आरोप हे निर्णयाचा आधार नसल्याचेही नमूद आहे.

 

अर्जदाराचे विश्वस्तपद कमी करण्यासंबंधीचा बदल अहवाल अद्याप अंतिम नसल्याने अर्जदाराचा locus standi कायम असल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर अर्जदार संजय थोबडे यांनी माननीय उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला असून, पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगितले आहे.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!