तरुणांसाठी उज्ज्वल भविष्याचा मार्ग खुला करणाऱ्या “टोयोटा कौशल्या” उपक्रमांतर्गत टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. कडून जागतिक दर्जाचे शिका आणि कमवा प्रशिक्षण उपलब्ध!
डायरेक्टरेट जनरल ट्रेनिंग (DGT) यांच्या सहकार्याने देण्यात येणारे हे निवासी तांत्रिक प्रशिक्षण पूर्णतः शून्य रुपये खर्चात मिळणार आहे.
१८ ते २२ वर्ष वयोगटातील, १० वी उत्तीर्ण, अविवाहित तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. ऑटोमोटिव्ह वेल्ड, पेंट, असेंबली आणि मेकॅट्रॉनिक्स अशा उच्च-क्षमतेच्या कोर्सेसद्वारे कौशल्य विकसित करून घेण्याची ही उत्तम संधी आहे.
यामध्ये सहभागी होणाऱ्यांना काय मिळणार –
▪ प्रशिक्षण काळात मासिक रू. १५,८१५/- विद्यावेतन
▪ राहण्याची व्यवस्था, कॅन्टीन, फिटनेस सेंटर, संगणक कक्ष, ग्रंथालय, क्लिनिक व २४x७ देखरेख
▪ कोर्स पूर्ण केल्यानंतर १ वर्ष Apprenticeship
▪ नंतर रोजगाराच्या संधींसाठी अर्ज करण्याची पात्रता
▪ जपान–इंडिया Institute for Manufacturing चे प्रमाणपत्र
करिअरला जागतिक स्तराचे तांत्रिक कौशल्य देण्यासाठी ही सुवर्णसंधी गमावू नका.
खालील लिंकवर क्लिक करून लगेच नोंदणी करा:
https://forms.office.com/r/apydbQEqgp
अधिक माहितीसाठी:
https://www.toyotabharat.com/toyota-in-india/ttti/
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






