spot_img
spot_img
spot_img
spot_img

बोरामणी येथे शुक्रवारी दावलमलिक बाबा ऊरुस

बोरामणी येथे शुक्रवारी दावलमलिक बाबा ऊरुस

 

सोलापूर (प्रतिनिधी) – द. सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील ग्रामदैवत व हिंदू–मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत पीर दावलमलिक बाबांचा वार्षिक ऊरुस येत्या शुक्रवारी (५ डिसेंबर) मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.

 

प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही ऊरुस पंच समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (४ डिसेंबर) रात्री ८ वाजता ढोल–ताशांच्या गजरात गावातून संदलची मिरवणूक निघणार असून रात्री १२ वाजता संदलचे देवस्थानाकडे प्रयाण होणार आहे.

 

शुक्रवारी दिवसभर ऊरुसाचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार असून भाविकांचे दर्शन, नैवेद्य कार्यक्रम यावेळी होणार आहेत. तसेच शनिवारी (६ डिसेंबर) दुपारी ४ वाजता जंगी कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून नामांकित मल्ल कुस्तीची जोरदार शर्यत सादर करणार आहेत.

 

देवस्थान बोरामणीपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असून भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने रस्त्यांची डागडुजी करून व्यवस्था सुधारली आहे. उरुसाच्या दिवशी महाराष्ट्र, कर्नाटक आणि मराठवाडा भागातून हजारो भाविक दर्शनासाठी येथे येतात.

 

देवस्थान परिसरात बोरामणी ग्रामपंचायतीच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छता व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गर्दी लक्षात घेता ग्रामीण पोलिसांचा योग्य बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने बोरामणी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

 

भाविकांनी या वार्षिक उरुसाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ऊरुस पंच समिती व ग्रामस्थांनी केले आहे.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*

*सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*   बार्शी : सरपंच म्हणजे आजची युवा शक्ती, आणि...

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!