spot_img
spot_img
spot_img
spot_img

सोलापूर विमानतळ सुरक्षेसाठी मनपाची कडक कारवाई; नागरिकांना सहकार्याचे आवाहन

सोलापूर विमानतळ सुरक्षेसाठी मनपाची कडक कारवाई; नागरिकांना सहकार्याचे आवाहन

 

सोलापूर विमानतळ परिसरातील सुरक्षेसाठी मनपाने जलदगतीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. नई जिंदगी परिसरातील मटण–चिकन विक्रेत्यांचे सर्वेक्षण करून उघड्यावर मांस विक्री बंद, कचरा फक्त बंद डब्यातच टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

दोन स्वतंत्र घंटागाड्यांद्वारे कचरा संकलनाची व्यवस्था केली असून सुपरवायझरना नोंदवही ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्य आरोग्य निरीक्षक आणि तीन आरोग्य निरीक्षकांना आठवड्यातून नियमित तपासणीचे आदेश दिले आहेत.

 

विमानतळ परिसरात किंवा शहरात सार्वजनिक ठिकाणी मांस-कचरा टाकणाऱ्यांवर मनपा थेट दंडात्मक कारवाई करणार आहे. शिवाय, शहरातील ३६२ मांसविक्रेत्यांपैकी विनापरवाना काम करणाऱ्यांवर अन्न–औषध प्रशासनाकडूनही कारवाई होणार आहे.

 

घटनांची तत्काळ नोंद करण्यासाठी आरोग्य निरीक्षकांचे मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले असून तक्रारकर्त्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे.

 

मनपाने नागरिकांकडून विमानसेवा निर्विघ्न आणि सुरक्षित ठेवण्यासाठी पूर्ण सहकार्याचे आवाहन केले आहे.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!