spot_img
spot_img
spot_img
spot_img

मंगळवेढा : सोड्डी फाट्यावर टेम्पो अडवून चालकांवर मारहाण; सहा जण अटकेत

मंगळवेढा : सोड्डी फाट्यावर टेम्पो अडवून चालकांवर मारहाण; सहा जण अटकेत

 

बेंगलोरकडे जनावरे घेऊन जाणारा आयशर टेम्पो (क्र. MH45/AX 4647) मंगळवेढा तालुक्यातील सोड्डी फाट्यावर निळ्या टाटा झेस्ट गाडीने (क्र. MH04/HF 9843) आडवा लावून थांबवण्यात आला. हुलजंती व करजगी येथील सागर भोरकडे, अविनाश भोरकडे, अर्जुन माने, तुकाराम रुपटक्के, बिरुदेव शिकतोडे व दयानंद बजंत्री या सहा जणांनी चालक गणेश कुंभार व त्याच्या सोबत्यांना लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण करून ३,००० रु. रोख व ५,000 रु. UPI द्वारे जबरदस्ती उकळले.

 

फिर्यादीच्या तक्रारीवरून मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली. २२ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने त्यांना २६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

 

Disclaimer – बातमी मध्ये वापरलेला फोटो हा AI वापरून बनवलेला आहे..!

 

दक्षता मुख्य संपादक:-दत्ता सुरवसे

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!