spot_img
spot_img
spot_img
spot_img

मा. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे आणि मा. पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या आदेशानुसार सोलापूर शहरात बेवारस वाहन हटाव मोहीम सुरू आहे. आज दिनांक ११ नोव्हेंबर रोजी विभागीय कार्यालय क्र. ८ हद्दीत पाच वाहनांवर कारवाई करण्यात आली. शानदार चौक येथे उभे असलेले आयशर ट्रक जप्त करण्यात आले, तर गुरुनानक चौक पोस्ट ऑफिस, कुर्बान हुसेन नगर परिसरातील दोन रिक्षा उचलून दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच भद्रावती पेठ आणि मोदी कब्रस्तान येथील चारचाकी वाहने त्यांच्या मालकांनी स्वतः काढून घेतली.

ही कारवाई अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या नियंत्रणा खाली महानगरपालिका मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधिक्षक वाहन अनिल चारटे,आरोग्य निरीक्षण निरीक्षक व वाहतूक पोलिसांच्या संयुक्त टीममार्फत पार पडली. सार्वजनिक रस्त्यावर दीर्घकाळ उभी ठेवलेली वाहने त्वरित हलवावीत, अन्यथा ₹१०,००० दंड, टोविंग खर्च आणि लिलावाची कारवाई होईल, असा इशारा मनपाने दिला आहे.

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांची सैनिक स्कूलसाठी निवड*

*महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांची सैनिक स्कूलसाठी निवड* महाराष्ट्र विद्यालयातील इयत्ता पाचवीतील दोन विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले असून त्यांची भारतीय...

तुळजापूरमध्ये लाचखोर सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात; ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

तुळजापूरमध्ये लाचखोर सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात; ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!   धाराशिव : दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी, गुन्ह्यात कलमवाढ न करण्यासाठी आणि मोटारसायकल...
spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!