#सोलापूरातील_धक्कादायक_वास्तव__310_दिवसांत_235_जण_बेपत्ता
#त्यापैकी_123_महिला_त्यात_जवळपास_105_युवती
#कुणाची_बहिण__कुणाची_मुलगी__सोलापूरातून_एका_क्षणात_गायब
सोलापूर – पोस्टचे शीर्षक वाचून तुम्हालाही धक्का बसेल. पण हे वास्तव आहे. कारण 01 जानेवारी 2025 ते 08 नोव्हेंबर 2025 या अवघ्या 310 दिवसांत सोलापूर शहरातून तब्बल 235 जण बेपत्ता झाले आहेत. आणि त्यातील 123 ह्या महिला आणि युवती आहेत. हे आकडे फक्त आकडे नाहीत, हे जीवंत माणसांच्या कथा आहेत.
कुणाला रात्रीच्या अंधारात कोणी तरी हात पकडून नेलं… कुणाच्या तरी डोळ्यांसमोरून ती हसत-खेळत गेली आणि परतलीच नाही…लग्नाची स्वप्नं संपली, तरीही त्यांचा थांगपत्ता लागेना.
पण दुर्दैवाने, पोलिस स्टेशनच्या फाईल्समध्ये त्याचा फोटो धूळ खात पडलेत. “कारवाई सुरू आहे” म्हणून महिने निघून जातायत. पण त्या 123 स्त्रियांच्या जीवावर काय बीतत असेल.? ट्रॅफिकिंगच्या अंधार्या कोठड्या.? बलात्कार.? छळ.? की.., मृत्यू.?
हे तर देवालाही माहित नाही, कारण पोलिसांना मिसिंगचा तपास करण्यासाठी वेळच नाही.! पोलिसांची कारवाई इतकी संथ आहे की, हे बेपत्ता झालेले लोक कुठे आहेत, त्यांच्यावर काय परिस्थिती येत असेल. हे फक्त देवच जाणतो. ट्रॅफिकिंग, अपहरण, हिंसा… या सगळ्या शक्यता मन सुन्न करतात. महिला सुरक्षेच्या नावाने मोठमोठ्या घोषणा होतात, पण प्रत्यक्षात काय तर फक्त कागदोपत्री कारवाई होते.? त्यामुळे आपल्या कुटुंबातील कोणावरही हे संकट येऊ नये, म्हणून महिला सुरक्षेसाठी आपण सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे.
#स्रोत – महाराष्ट्र शासनाच्या वेबसाइटवरील आकडेवारी.
आपलाच – ॲड. योगेश (दत्ता) पवार.!.YP ©️®️
प्रदेश उपाध्यक्ष – राष्ट्रीय छावा संघटना, महाराष्ट्र.
माहिती अधिकार कार्यकर्ता, महाराष्ट्र राज्य.
सूचना प्रदाता (व्हिसल ब्लोअर), महाराष्ट्र.
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






