spot_img
spot_img
spot_img
spot_img

पुणे : सर्व्हिकल कॅन्सर मुक्त पुणे प्रकल्प शुभारंभ

पुणे : सर्व्हिकल कॅन्सर मुक्त पुणे प्रकल्प शुभारंभ

 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यात ‘ सर्व्हिकल कॅन्सर मुक्त पुणे प्रकल्प’चा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.

 

हा उपक्रम पुणे जिल्ह्यातील महिलांमधील सर्व्हिकल कॅन्सर या आजाराविरोधातील लढ्यात मोलाचा टप्पा सिद्ध होणार आहे. प्रतिबंध, जनजागृती, लसीकरण आणि समयोजित स्क्रीनिंगच्या माध्यमातून कॅन्सरचे संपूर्णपणे निर्मूलन करणे आहे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. स्त्रीयांमध्ये होणारा सर्व्हिकल कॅन्सर हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रखर आजार असून जागतिक पातळीवर जवळपास २३ टक्के भाग भारतात आहे. HPV लस व वेळेवर केलेल्या स्क्रीनिंगमुळे यात प्रभावीपणे प्रतिबंध करता येऊ शकतो, मात्र सध्या नागरिकांमध्ये जनजागृती व लसीकरणाचे प्रमाण खूपच कमी आहे. ‘ सर्व्हिकल कॅन्सर मुक्त पुणे प्रकल्प’ हा प्रभावी प्रतिबंधात्मक योजना राबवण्याचा उद्देश बाळगतो.

WHO च्या Cervical Cancer Elimination Strategy अंतर्गत ९०-७०-९० या लक्ष्यांच्या पूर्ततेसाठी हा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. ९०% मुलींचे लसीकरण, ७०% महिलांचे स्क्रीनिंग, आणि सकारात्मक लक्षणे असलेल्या ९०% महिलांचे उपचार यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या शाळेतील १००% मुलींचे लसीकरण केले जाणार आहेत. त्यानंतर अनुदानित शाळांमधील मुलींचेही लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी ९-१४ वयोगटातील किशोरवयीन मुलींना प्रशिक्षित नर्सेसच्या देखरेखीखाली दोन डोसेस Cervavac HPV लस दिल्या जातील.

या प्रकल्पांतर्गत शाळांमध्ये लसीकरणाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ASHA सेविकांकडून घराघरात जाऊन महिला वर्गासाठी सर्व्हिकल कॅन्सर स्क्रीनिंगची माहिती दिली जाणार आहे.

 

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. Jivika Foundation द्वारे वैद्यकीय आणि कायदेशीर सहकार्य लाभले आहे.

हा उपक्रम समाजात रोगप्रतिकारशक्ती वाढवून HPV लसीकरणाबाबत सकारात्मक वृत्ती निर्माण करण्यास मदत करेल आणि महाराष्ट्रात तसेच देशात इतर ठिकाणी हा एक आदर्श मॉडेल म्हणून स्वीकारला जाईल हा विश्वास पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

 

या प्रसंगी उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. राजेश देशमुख, डॉ. संतोष भोसले तसेच प्रमुख भागीदार संस्थांमध्ये जीवीका फाउंडेशन, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, अमेरिका इंडिया फाउंडेशन या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

Gajanan Patil

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!