spot_img
spot_img
spot_img
spot_img

श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्रातील एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतीराव फुले योजनेचे उद्घाटन आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश शेटे सर यांच्या हस्ते आज संपन्न झाले. शिवचरित्रकार डॉ.शिवरत्न शेटे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

विशेषतः पूर्व भाग आणि एकूणच शहरात आर्थिक दुर्बल रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून त्यांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवेसाठी श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतीराव फुले योजना नसल्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नव्हता. शासन दरबारी श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात या शासकीय योजना सुरू व्हाव्यात याकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब,आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे सर यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

नुकत्याच शासनाने श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे ‘ड’ वर्ग श्रेणीतून ‘अ’ वर्ग श्रेणीत समावेश करून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतीराव फुले लागू करण्यासाठी मोठी मदत झाली.

 

याप्रसंगी रुग्णालयाचे प्रेसिडेंट श्री. सत्यनारायण बोल्ली साहेब, चेअरमन डॉ.माणिक गुर्रम, माजी स्थायी समिती सभापती विनायक दादा कोंड्याल, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे,गुरूशांत धुत्तरगावकर, काशिनाथ गड्डम,रमेश विडप,श्रीनिवास कमटम,श्रीधर बोल्ली,सुधाकर गुंडेली, यांच्या सह रुग्णालयाचे अन्य मान्यवर उपस्थित होते.

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!