spot_img
spot_img
spot_img
spot_img

मराठी साहित्य संमेलनाच्या पत्रिकेत ‘अक्षम्य’ चुका, शिवसैनिकांचा संताप अनावर!

90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत अक्षम्य चुका आढळून आल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पददेखिल यात चुकविण्यात आले आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष असे पद त्यांच्या नावासमोर लिहिण्यात आले आहे.

कल्याणमधून लोकसभेवर निवडून गेलेले उच्च शिक्षित खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे एस. एस. ऑर्थोपेडिक आहेत. पण त्यांच्या नावासमोर डॉक्टर लिहिण्यात आलेले नाही. विधान परिषदेचे आमदार रविंद्र फाटक यांचे नाव चक्क पाठक असे लिहिण्यात आले आहे.

कल्याण-डोंबिवली येथील नामवंत आणि अनुभवीत व्यक्तिंना डावलून मर्जीतील लोकांना संमेलनाच्या नियोजन समितीत स्थान देण्यात आल्याने या चुका झाल्याचे शिवसैनिकांनी सांगितले आहे. दरम्यान, आयोजकांनी लगेच या चुका सुधाराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.

Related Articles

सोलापूरकरांनी जाणून घेतला भुईकोट किल्ला!

सोलापूरकरांनी जाणून घेतला भुईकोट किल्ला! -- इको फ्रेंडली क्लबकडून पर्यटन दिनाच्या निमित्ताने भटकंती -- सोलापूर : सोलापुरात अनेक वर्ष राहून सुद्धा आम्ही कधीच भुईकोट किल्ला पाहिला नव्हता! आज...

माऊली लाॅन्स व माऊली उद्योग समूह व माऊली परिवार यांच्या वतीने तुळजापूरला पाई चालत जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी बावी फाटा या ठिकाणी 15 ते 20...

माऊली लाॅन्स व माऊली उद्योग समूह व माऊली परिवार यांच्या वतीने तुळजापूरला पाई चालत जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी बावी फाटा या ठिकाणी 15 ते 20...
spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!