spot_img
spot_img
spot_img
spot_img

रेशनचा तांदूळचा काळया बाजारात उलाढाल करणाऱ्या आणि गुन्हा केल्यानंतर दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपींना पथकाकडून शीताफीने अटक…

रेशनचा तांदूळचा काळया बाजारात उलाढाल करणाऱ्या आणि गुन्हा केल्यानंतर दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपींना पथकाकडून शीताफीने अटक…

 

बार्शी :

बार्शी तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 232/2026, भारतीय न्याय संहिता कलम 316( 2), 316 (5) सह अत्यावश्यक वस्तू अधिनियम 3 व 7 प्रमाणे बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.. या गुन्ह्यात तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता . यामधील आरोपी 1) दिगंबर उर्फ आप्पा संभाजी सुरवसे आणि 2) विवेक उर्फ भगवान संभाजी सुरवसे दोघे राहणार बुरुड गल्ली, तालुका बार्शी हे दोघेही गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झालेले होते..

या दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन माननीय न्यायालयाने रद्द केल्यानंतर या आरोपींना पकडण्यासाठी बार्शी तालुका पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांनी सापळा रचला..

या आरोपींनी जवळपास सात मोबाईल क्रमांक बदलून तसेच वेशभूषा बदलून विविध जिल्ह्यांमध्ये लपून राहिलेले होते.. परंतु काल रोजी हे आरोपी बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीत लपून बसल्याचे तांत्रिक विश्लेषणावरून समजल्यानंतर सदर ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी त्यांच्या टीमसह सापळा रचून हे दोन्ही आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना पकडून अटक केलेली आहे..

या दोन्ही आरोपींना आज रोजी माननीय न्यायालयात पोलीस कस्टडी रिमांड करिता हजर केले असता माननीय न्यायालयाने या आरोपींची चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे.

सदरची कारवाई ही वरिष्ठ पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, बाबासाहेब हांडे, प्रदीप जगताप, सिद्धेश्वर लोंढे, गोविंद बचुटे, आकाश कांबळे तसेच सोलापूर ग्रामीण सायबर डिपार्टमेंट मधील राहुल सोनकर आणि विश्वनाथ वस्त्रद यांनी केलेली आहे..

Related Articles

सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*

*सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*   बार्शी : सरपंच म्हणजे आजची युवा शक्ती, आणि...

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!