spot_img
spot_img
spot_img
spot_img

आज सोलापूर जिल्हा परिषद कार्यालय येथे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विविध विषय समित्यांचे सभापती तसेच पंचायत समिती सभापती यांना अधिकृत वाहनांचे वितरण करण्यात आले.

आज सोलापूर जिल्हा परिषद कार्यालय येथे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विविध विषय समित्यांचे सभापती तसेच पंचायत समिती सभापती यांना अधिकृत वाहनांचे वितरण करण्यात आले.

 

या वाहनांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील विकासकामांचा प्रभावी आढावा घेणे, नागरिकांच्या समस्या तातडीने जाणून घेणे तसेच शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची अधिक कार्यक्षमतेने अंमलबजावणी करणे सुलभ होणार आहे. ग्रामीण विकास अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.

 

राज्य शासनाच्या लोकाभिमुख आणि विकासाभिमुख धोरणांतर्गत ग्रामीण भागातील प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी उचललेले हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल असून, यामुळे जनसेवा अधिक वेगवान आणि प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला.

 

याप्रसंगी आमदार श्री. देवेंद्रजी कोठे, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. दिपकजी वैद्य, उपाध्यक्ष श्री. इंद्रजितजी पवार, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मा. रामप्पाजी चिवडशेट्टी, समाजकल्याण समिती सभापती सौ. संस्कृतीताई सातपुते, शिक्षण व आरोग्य समिती सभापती श्री. चेतनसिंह केदार-सावंत, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. अमृताताई वाघे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप कोहिनकर, प्रशासकीय अधिकारी सौ. स्मिता पाटील तसेच सर्व पंचायत समिती सभापती, मान्यवर सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.

📍 सोलापूर जिल्हा परिषद कार्यालय, सोलापूर | २८ जून २०२६

 

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*

*सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*   बार्शी : सरपंच म्हणजे आजची युवा शक्ती, आणि...

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!