spot_img
spot_img
spot_img
spot_img

मंत्रालय, मुंबई

📍 मंत्रालय, मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणी फाउंडेशनच्या जलसंधारण कामाबाबतचे सादरीकरण करण्यात आले. ‘पाणी फाउंडेशन’ ने महाराष्ट्राच्या जलसंधारण क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. राज्य शासना समवेत राज्याला बसणाऱ्या दुष्काळाची तीव्रता कमी करण्यात मदत केली. यापुढेही फाउंडेशनच्या सहकार्याने पाणीदार महाराष्ट्राचा संकल्प करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग, #पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान, किरण राव, पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, तसेच अमित चंद्रा, विलास शिंदे आदी उपस्थित होते.

 

काही हवामानविषयक संस्थांच्या अंदाजानुसार यावर्षी एल निनोचा प्रभाव जाणवणार असल्याने राज्यात ८० टक्के पाऊस होईल, असे गृहीत धरून #जलसंधारण च्या कामांचे नियोजन करावे. पाणी फाउंडेशनच्या मागील कामाचा अनुभव बघता त्यांच्या माध्यमातून यावर्षीही शेतकरी, ग्रामस्थ जलसाक्षर होतील. पाण्याचे महत्त्व ओळखून फाउंडेशन करत असलेल्या कामासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी मदत करावी. त्यासाठी पूरक यंत्रणा सज्ज ठेवावी. फाउंडेशन राज्यात करीत असलेल्या जलसंधारणाच्या कामांमध्ये मृद व जलसंधारण विभागाचाही समावेश करावा. फाउंडेशनच्या माध्यमातून होत असलेल्या कामाचा दर्जा चांगला राखण्यासाठी, त्यांच्या मागणीनुसार नियंत्रण आणि पडताळणी यंत्रणेची आवश्यकता आहे. यासाठी कृषी सहाय्यक तसेच ग्रामविकास विभागाच्या उमेद अभियानामधील कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली व्यवस्था उभारण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

सोलापुरात दररोज २० हजार सिलेंडरचा पुरवठा…अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी 

सोलापुरात दररोज २० हजार सिलेंडरचा पुरवठा...अफवांवर विश्वास ठेवू नका - जिल्हाधिकारी सोलापूर जिल्ह्यात घरगुती गॅसच्या तुटवड्याच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र...
spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!