माहिती येथे वाचा 👇👇👇
⚖️ तुमच्या वकिलाने तुमच्यासोबत फसवणूक (Fraud) केली तर काय कराल?
👉 प्रत्येक क्लायंटने नक्की माहिती ठेवावी अशी महत्त्वाची माहिती
वकील हा सुद्धा कायद्याच्या चौकटीतच काम करतो
आणि
त्याने विश्वासघात किंवा फसवणूक केली तर
त्याच्यावर गंभीर कारवाई होऊ शकते.
.
.
☆ फसवणूक म्हणजे नेमकं काय?
● केसचं काम न करता पैसे घेणे
● कोर्टात जाण्याचं सांगून न जाणे
● बनावट कागदपत्र तयार करणे
● विरोधी पक्षाशी संगनमत करणे
● चुकीची माहिती देऊन नुकसान करणे
अशा कृतींना कायद्यात व्यावसायिक गैरवर्तन (Professional Misconduct) आणि
काही वेळा फौजदारी गुन्हा मानलं जातं.
.
.
☝️ तुमच्याकडे उपलब्ध कायदेशीर पर्याय
☆ Bar Council मध्ये तक्रार
जर वकीलाने गैरवर्तन केलं असेल तर
State Bar Council कडे लेखी तक्रार करता येते
शक्य कारवाई
● चौकशी
● License suspend
● License कायमच रद्द
ही सर्वात प्रभावी कारवाई मानली जाते.
.
.
☆ फौजदारी गुन्हा (FIR)
जर वकीलाने जाणूनबुजून फसवणूक केली असेल तर
👉 फसवणूक / विश्वासघात यांसारख्या कलमांखाली FIR दाखल होऊ शकते
उदा.
● पैसे घेऊन काम न करणे
● बनावट कागदपत्र
.
.
☆ नुकसान भरपाई (Compensation)
जर तुमचं आर्थिक नुकसान झालं असेल तर
Civil case दाखल करून नुकसान भरपाई मागू शकता
.
.
☆ क्लायंटने काय काळजी घ्यावी?
● फीची पावती घ्या
● केसचे कागदपत्र स्वतःकडे ठेवा
● केसची status वेळोवेळी तपासा
● फक्त तोंडी बोलण्यावर विश्वास ठेवू नका
.
.
अनेक लोक फसवणूक झाल्यानंतर
आता काहीच होणार नाही म्हणून गप्प बसतात.
पण गप्प बसणं म्हणजे चुकीला पाठिंबा देणं
तुमच्यासोबत अन्याय झाला असेल तर
☝️ आवाज उठवा कायदा तुमच्यासोबत आहे
.
.
🔔 ही माहिती नक्की Share करा
कदाचित तुमच्या एका Share मुळे
कोणाचा तरी मोठा नुकसान वाचू शकतो
.
.
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






