spot_img
spot_img
spot_img
spot_img

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ अंतर्गत एका महिन्यात 45,911 सौर कृषी पंप लावण्याचा जागतिक उच्चांक गाठल्याबद्दल राज्य शासनाच्यावतीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स प्रमाणपत्र स्वीकारले.

यावेळी मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

CM Devendra Fadnavis received the Guinness World Records certificate on behalf of Government of Maharashtra, for achieving the world record of successfully installing 45,911 solar agriculture pumps within one month under the ‘Magel Tyala Solar Krushi Pump Yojana’.

Minister Atul Save, MoS Meghna Bordikar and other dignitaries were present.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ के अंतर्गत एक महीने में 45,911 सौर कृषि पंप स्थापित करने का वैश्विक रिकॉर्ड बनाए जाने पर राज्य सरकार की ओर से गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्स प्रमाणपत्र स्वीकार किया।

इस अवसर पर मंत्री अतुल सावे, राज्य मंत्री मेघना बोर्डीकर एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।

 

शेतकरी सशक्तीकरणाची नवी सौर गाथा!

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ अंतर्गत एका महिन्यात 45,911 सौर कृषी पंप लावण्याचा जागतिक उच्चांक गाठल्याबद्दल राज्य शासनाच्यावतीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स प्रमाणपत्र स्वीकारले.

 

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा कार्यक्रम हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे कारण 2014 ते 2019 च्या कालावधीत महाराष्ट्राला प्रचंड दुष्काळाचा सामना करावा लागला होता, त्यावेळी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत असताना पाण्याची आणि विजेची अडचण प्रमुख अडचण असल्याचे लक्षात आले. शेतकऱ्यांना दिवसा आणि रात्री अपुरी वीज मिळायची, त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी होती की त्यांना दिवसा 12 तास वीज मिळावी. त्या अनुषंगाने योजना आखण्यास सुरुवात झाली.

 

ज्यावेळी जलयुक्त शिवार योजना राबवली गेली, तेव्हा उच्च न्यायालयाच्या कमिटीमध्ये असे समोर आले की, महाराष्ट्राची आणि त्यातही मराठवाड्याची पाण्याची पातळी वाढली आहे, परंतु ते पाणी शेतीमध्ये वापरले जाण्याकरिता दिवसा विजेची आवश्यकता होती. तसेच विशेषतः रात्री शेतीची कामे करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी यायच्या, अशा विविध कारणांमुळे शेतीवर विविध बंधने येत होती, या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र शासनाने सौर कृषी वाहिनी ही योजना सुरु केली आणि त्याचा पहिला प्रयोग राळेगणसिद्धी येथे करण्यात आला जो यशस्वी झाला. त्याचवेळी 1 लाख सौरपंपाची योजना घोषित करण्यात आली, असे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची सौर कृषीपंप आणि सौर कृषीवाहिनी योजना इतर राज्यांनीही सुरू कराव्यात असे आवाहन केले. तसेच ‘पीएम कुसुम योजने’च्या अंतर्गत सौर कृषीपंप आणि सौर कृषीवाहिनी या दोन्ही योजना समाविष्ट केल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की आज देशामध्ये कुसुम योजनेच्या अंतर्गत एकूण 9.5 लाख सौरपंप लागले आहेत, त्यापैकी 7 लाख सौरपंप महाराष्ट्र राज्याने लावले आहेत. म्हणजेच देशातील सौरपंपांपैकी 65% सौरपंप महाराष्ट्र राज्यात लागले गेले आहेत, याचा फायदा असा की, महाराष्ट्राचे शेतकरी 365 दिवस मोफत वीज वापरु शकतात. दरवर्षी फक्त 20 ते 25 हजार सौर कृषीपंप लावणारा महाराष्ट्र, एका महिन्यात 45,911 सौर कृषीपंप लावतो, जे अभिमानास्पद आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांची सैनिक स्कूलसाठी निवड*

*महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांची सैनिक स्कूलसाठी निवड* महाराष्ट्र विद्यालयातील इयत्ता पाचवीतील दोन विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले असून त्यांची भारतीय...

तुळजापूरमध्ये लाचखोर सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात; ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

तुळजापूरमध्ये लाचखोर सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात; ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!   धाराशिव : दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी, गुन्ह्यात कलमवाढ न करण्यासाठी आणि मोटारसायकल...
spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!