किशोर चंडक यांना उत्कृष्ट तिकीट संग्राहक- भारताचे वरिष्ठ सुपरस्टार पारीतोषीक प्रदान
मुंबई : अंधेरी येथे रविवार १६ नोव्हेबर रोजी झालेल्या एका भव्य कार्यक्रमात , *खयाल~ ५० वरिल ५० – उत्कृष्ट तिकीट संग्राहक- भारताचे वरिष्ठ सुपरस्टार* या पारीतोषीकाने सोलापूरचे ख्यातनाम उद्योगपती व संग्राहक किशोर चंडक यांना विभूषीत करण्यात आले. पारितोषिकाचे स्वरूप सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व रोख रूपये १,००,००० असे होते. पुरस्कार बेंगरूलूचे प्रसिध्द नाणे संग्राहक राजेंद्र मारू सांच्या हस्ते देण्यात आले. सदर सभारंभात सुदेश भोसले, रोहीणी हत्तंगडी, अतुल खत्री, तौफीक कुरेशी, निखील राणे, मेघना इरांडे, कृष्णा बोंगने इत्यादी नामांकीत कलाकार तसेच भारतातील वेगवेगळ्या विषयात पारंगत असलेले पारीतोषीक विजेते हजर होते. या सर्व कलाकारांनी आपल्या कलेने लोकांना मंत्रमुग्ध केले. एकूण ५० निरनिराळ्या श्रेणी मधील प्रत्येकी ५ मान्यवर भारतभरातून अंतिम फेरी साठी निवडण्यात आले होते. त्या मधून प्रत्येकी एक पारीतोषीक विजेत्याला मान्यवरांकडून सन्मानीत करण्यात आले.
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






