spot_img
spot_img
spot_img
spot_img

अण्णा बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्हा सहसंपर्कमंत्रीपदी नियुक्ती

अण्णा बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्हा सहसंपर्कमंत्रीपदी नियुक्ती

 

उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली मान्यता; कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण

 

सोलापूर (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर जिल्हा आढावा बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची सोलापूर शहर जिल्हा सहसंपर्कमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

मुंबईतील वरळी येथे नुकत्याच पार पडलेल्या या आढावा बैठकीदरम्यान सोलापूर शहर व ग्रामीण जिल्ह्याच्या सामाजिक समीकरणांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष उमेश पाटील व शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी, विद्यमान संपर्कमंत्री कृषीमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या जोडीला सहसंपर्कमंत्री म्हणून अण्णा बनसोडे यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली होती.

 

या मागणीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तात्काळ दखल घेत, सामाजिक समतोल लक्षात घेऊन अण्णा बनसोडे यांच्या नियुक्तीस मान्यता दिली.

 

या निर्णयाचे स्वागत सोलापूर जिल्ह्याच्या वतीने ग्रामीण जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, आनंददादा चंदनशिवे, तसेच ज्येष्ठ नेते तोफिक शेख यांनी केले.

 

आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये संपर्कमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या बरोबरच अण्णा बनसोडे हे सोलापूरच्या निवडणूक नियोजनात सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत. लवकरच सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे आयोजन करून निवडणुकीसंदर्भात रणनीती ठरवण्यात येणार आहे.

 

या दोन नेत्यांच्या नेतृत्वामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणुका जोमाने लढविण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!