*सोलापूर श्री सोमवंशीय सहस्रर्जुन क्षत्रिय समाजाकरिता अभिमानास्पद बातमी* सोलापूरचे समाजसेवक श्री किरण भीमराव पवार यांचे सुपुत्र डॉ. कृष्णा किरण पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या कामगिरीने विज्ञान क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. डॉ. कृष्णा यांनी मास्टर्स आणि पीएचडी भौतिकशास्त्रातील सेमीकंडक्टर या विषयात केली असून, ते सध्या शिवाजी विद्यापीठातील स्कूल ऑफ नॅनोसायन्स अंड बायोटेक्नॉलॉजी येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नुकताच दरसालाप्रमाणे स्टॅंडफोर्ड विद्यापीठ (जगात पहिले ३ रे विद्यापीठ) या संस्थेने जागतिक अग्रगण्य २% शास्त्रज्ञ ची नावे जाहीर केले आहे. या संशोधन अहवालानुसार डॉ. कृष्णा यांचे सेमीकंडक्टर आणि त्यानिगडित तंत्रज्ञानाचे कार्य अग्रगण्य २% (words टॉप २%) श्रेणीत गणले गेले आहे. याचाच सरळ अर्थ म्हणजे डॉ. कृष्णा यांचे नाव जगातल्या टॉप २% शास्त्रज्ञ म्हणून नावजले आहे. आपण सर्वांनाच माहिती आहे की सध्या जगाच्या तंत्रज्ञानाची धुरा सेमीकंडक्टर या विषयासंबंधी फिरते. जगातील सर्व महासत्ता फक्त आणि फक्त सेमीकंडक्टर चिप प्रोडक्शन स्वदेशात करत असल्यामुळे त्यांच्या देशाला आर्थिक गती मिळत आहे. भारत सध्या चिप प्रोडक्शन करण्यात सक्षम नाहीये आणि चिप बनवण्याचे कारखाने व प्रशिक्षित अधिकारी नसल्याने भारत मागे पडत आहे. अश्या काळात आपल्या देशातील तरुण चिप स्वतः बनवू शकतील याचे प्रशिक्षण डॉ. कृष्णा देत आहेत. डॉ. कृष्णा यांनी दक्षिण कोरिया येथे जाऊन सॅमसंग आणि ह्युंदाई या कंपनी साठी सुद्धा काम केले आहे. त्यांनी उत्तर अमेरिकेत हॉलिवूड येथील जी जाळपोळ झाली त्याचे व्याज्ञानिक विश्लेषण पण क्रून दिले आहे. अश्या अनेक जंगलात आग लागते आणि ते समजे पर्यंत लाखो झाडे जळून खाक होतात यासाठी अनेक सेन्सर डॉ. कृष्णा यांनी बनवले आहे. तसेच परदेशात मद्य आणि सिगेटर पुणून कोणीही गाडी चालवू नये म्हणून अनेक सेन्सर बसणवले असतात त्यातील ह्युंदाई ने डॉ. कृष्णा कडून अनेक सेन्सर बनवून घेतले आहे.
सोबतच आपल्याट्राफिक सिग्नला प्रमाणे विकसित देशात प्रदूषणाचे सिग्नल असतात ते दक्षिण कोरियाततील सियोल या राजधानीत त्यांच्या प्रयोगशाळेने प्रदूषण नियंत्रक बनवले आहेत.
आजवर डॉ. कृष्णा यांनी आपल्या १६ विद्यार्थ्यांना जपान, कोरिया, ऑस्ट्रेलिया, तैवान व इतर देशात नोकरी मिळवण्यास मदत केली आहे. अनेक स्वयमसेवी संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवून त्यांची प्रगतीस हातभार लावत आहेत.
दक्षता उपसंपादक : राजन क्षत्रिय






