spot_img
spot_img
spot_img
spot_img

सोलापूरमध्ये ड्रोनला ब्रेक! पंढरपूर-अक्कलकोट झाले नो-फ्लाय झोन

सोलापूरमध्ये ड्रोनला ब्रेक! पंढरपूर-अक्कलकोट झाले नो-फ्लाय झोन

 

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडविण्यावर बंदी

 

पंढरपूर व अक्कलकोट धार्मिक स्थळे ‘नो-फ्लाय झोन’ घोषित

 

सोलापूर,/ प्रतिनिधी

 

कार्तिकी वारी यात्रेदरम्यान पंढरपूर आणि अक्कलकोट येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील काही धार्मिक स्थळांना ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

 

भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ नुसार जिल्हा प्रशासनाने हे आदेश जारी केले असून, पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात ड्रोन उडविण्यास संपूर्ण बंदी राहणार आहे.

 

ही बंदी २७ ऑक्टोबर २०२५ पासून पुढील ६० दिवस लागू राहणार असून, त्यादरम्यान कोणत्याही व्यक्तीस या परिसरात ड्रोन उडविण्याची परवानगी दिली जाणार नाही.

 

सुरक्षाविषयक सूत्रांच्या माहितीनुसार, यात्रेच्या काळात देशविरोधी घटक किंवा दहशतवादी संघटना स्लीपर सेल सक्रीय करण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे ही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे.

 

जिल्ह्यातील सर्व ड्रोन परवाना धारक व चालकांनी त्यांच्या ताब्यातील ड्रोनची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय नागरीक सुरक्षा संहितेनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

दक्षता उपसंपादक : राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!