spot_img
spot_img
spot_img
spot_img

अक्कलकोट येथे भाविकांची अलोट गर्दी ; पहिल्यांदाच विक्रमी भाविकांनी फुलले अक्कलकोट नगरी

अक्कलकोट येथे भाविकांची अलोट गर्दी ; पहिल्यांदाच विक्रमी भाविकांनी फुलले अक्कलकोट नगरी

अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ नगरीत दिवाळीच्या सुट्टी निमित्त मागील पाच दिवसापासून भाविकांच्या प्रचंड गर्दीने सर्व रस्ते फुलले असून संपूर्ण शहर स्वामीभक्त आणि त्यांच्या वाहनाने गजबजून गेल्याचे चित्र दिसत आहे. अक्कलकोटच्या गर्दीने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढल्याचे स्पष्ट होत असून हजारो वाहने अक्कलकोट शहरांमध्ये दाखल झालेले आहेत. सर्व लॉज दुकाने आणि हॉटेल्स हे हाउसफुल झालेले असून शहरात सर्वत्र व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक ओलाडाल झाल्याचे दिसून आले. भाविकांच्या गर्दीच्या प्रमाणात त्यांना सुखसोयी मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यांच्यासाठी आणखी सुखद अनुभव देणारी निवास निवास व्यवस्था, शहरात शौचालयाची पुरेशी संख्या, पिण्याच्या स्वच्छ पाण्याचे सर्वत्र मुबलक पुरवठा, शहरातील अंतर्गत रस्त्यांची आणखी डागडुजी या सर्व गोष्टी तातडीने होणे क्रम प्राप्त आहे. यासाठी अक्कलकोट शहर आणखी स्वच्छ सुंदर आणि मुबलक सोयी सुविधा देणारे असावे अशी स्वामी भक्तांची आणि शहरवासीयांची अपेक्षा आहे.

अक्कलकोट शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर

 

दिवाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या मोठ्या गर्दीमुळे मगरुळे चौक, मेन रोड, मल्लिकार्जुन चौक, हन्नूर रोड आणि एसटी स्टँड परिसरात तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.स्थानिक नागरिक आणि भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, भविष्यात अशा परिस्थिती टाळण्यासाठी सिग्नल यंत्रणा आणि पोलीस वाहतूक नियंत्रण यंत्रणा सज्ज करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

 

  • दक्षता मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

सोलापूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या जाहीरनाम्याचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, खासदार श्री सुनील तटकरे साहेब, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्षा...

*जिल्हा मेळावा मध्ये महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश* 

*जिल्हा मेळावा मध्ये महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश* सोलापूर भारत स्काऊट गाईड यांच्यावतीने कर्मवीर विद्यालय चारे या ठिकाणी जिल्हा स्काऊट गाईड मेळावा संपन्न झाला. या जिल्हा...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!