spot_img
spot_img
spot_img
spot_img

आदिला नदी तीरावर दीपोत्सव!

आदिला नदी तीरावर दीपोत्सव!आदिला नदी तीरावर दीपोत्सव!

परंपरा, संस्कृती आणि संवर्धनाचा अनोखा संगम

सोलापूर : दिवाळीच्या पावन पर्वावर सोलापूर शहरातील आदिला नदी व परिसर संवर्धन कृती समितीच्या वतीने आज सायंकाळी ६ वाजता ‘आदिला नदी दीपोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दीपोत्सवाच्या माध्यमातून शहरवासीयांना आदिला नदीबद्दल आपलेपणाची जाणीव आणि संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन ह.भ.प. लक्ष्मण महाराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यांनी जलपूजन करून नदीची आरती केली. नदीकाठी रांगोळ्यांनी सजवलेल्या घाटांवर शेकडो दिव्यांची सजावट करण्यात आली होती. दिव्यांच्या प्रकाशात आरतीचा गजर आणि मंत्रोच्चार सुरू होताच वातावरण भक्तिभावाने भारून गेले.

आयोध्येतील शरयू नदी आणि वाराणसीतील गंगेप्रमाणेच सोलापूरकरांना आदिला तीरावर देखील दिव्यांची तीच आध्यात्मिक अनुभूती मिळाली. अनेक नागरिकांनी या क्षणाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. दीपोत्सवामुळे नदीकिनारा केवळ प्रकाशमयच नव्हे तर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उर्जेने उजळून निघाला.

कृती समितीचे अध्यक्ष राजकिरण चव्हाण यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून नदी संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, “नदी फक्त पाण्याचा प्रवाह नसून ती आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि अस्तित्वाचा भाग आहे. दीपोत्सव म्हणजे निसर्गाशी एकात्म होण्याचा प्रयत्न आहे.”

या प्रसंगी डॉ. उत्कर्ष वैद्य, निलेश कांबळे, बालाजी रोडगे, सुहास नारायणकर, राजू बारगजे, शिवाजी सानप, संजय तिर्‍हेकर आदी मान्यवरांसह शेकडो नागरिक उपस्थित होते. दीपोत्सवाने सोलापूरकरांना निसर्ग, श्रद्धा आणि संस्कृती यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. या उपक्रमातून “नदी वाचवा, संस्कृती जपा” असा प्रभावी संदेश समाजात पोहोचविण्यात आला.

उपसंपादक : राजन क्षत्रिय

Related Articles

सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*

*सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*   बार्शी : सरपंच म्हणजे आजची युवा शक्ती, आणि...

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!