*दया कुछ तो गडबड आहे…..*
1990 ते 1995 च्या दरम्यान सोलापुरातील सुप्रसिद्ध औद्योगिक बँक बंद पडली किंवा बंद पडण्यात आली.
त्यानंतर…
2005 ते 2010 च्या दरम्यान सोलापुरातील नामांकित बँक सोलापूर नागरी बँक बंद पडली किंवा बंद पाडण्यात आली…
त्यानंतर अलीकडेच 93 वर्ष जुनी व खातेदारांचा विश्वास संपादन केलेली लक्ष्मी बँक 2020 ते 2022 च्या दरम्यान बंद पडले किंवा बंद पाडण्यात आली…
आणि आता 8 ऑक्टोंबर 2025 रोजी अडीचशे कोटीच्या वर उलाढाल असलेली व अनेक ठेवीदार यांचा विश्वास संपादन केलेली… जिच्या 32 च्या वर शाखा… एक लाखाच्या वर ठेवीदार असलेली…. सोलापुरातील सुप्रसिद्ध समर्थ सहकारी बँक बंद पडली किंवा बंद पाडण्यात येईल….
ठेवीदारांच्या ठेवी एका दिवसात खालसा करायच्या….. लोकांना देशोधडीला लावायचं….. चार दिवस ओरडतील चिरखतील, पेपर बाजी करतील, कोर्टकचेर्या करतील व पुन्हा सर्व शांत होईल…
*दया कुछ तो बडबड आहे…*
एका सोलापूर शहरासारख्या ठिकाणी अवघ्या 30 ते 35 वर्षात चार बँका… तेही मोठ्या बँका बंद पडतात…. ठेवीदारांच्या ठेवी बुडवतात…. ठेवी मागायला गेले…. तर इन्शुरन्सचा हवाला देतात…. संचालक हात वर करतात…. *न्यूज चैनल वाले व ठेवी बुडालेले ठेवीदार बेंबीच्या देठापासून ठाहो फोडतात…. परंतु ना संचालकांना किव येते ना RBI वाल्यांना किव येते….*
या चारी बँकांना लुटण्यात सेम पॅटर्न…. सेम पॉलिसी….
*दया कुछ तो बडबड आहे…*
एका शहरात पांढरपेशांनी केलेली ही लुटमार… अशा प्रकारचे पॅटर्न इतरही शहरात राबविल्या गेल्या असतील याची शक्यता वाढली…. तर हा आकडा फार मोठा आहे…. *आता दरोडेखोरांची गरजच नाही, कारण कुंपणच शेत खात आहे…. व*
बँकांवर दिवसाढवळ्या पांढरपेशांनी दरोडा टाकायचा…. कष्टाने पै पै जमा करून आम्ही सर्वसामान्य माणसाने बँकात आमच्या सुरक्षेसाठी ठेवी ठेवायच्या…. RBI वाले आणि बँकेचे संचालक यांनी संगनमताने ठेवीदारांच्या ठेवी देण्यासाठी असमर्थता दाखवायची… आतापर्यंत जमा केलेल्या ठेवी गेल्या कुठे ? बँकेतच रोख स्वरूपात पडून असेल… बँकेच्या नावावर काही स्थावर मालमत्ता घेतले असतील…. बँकेच्या संचालकांनी स्वतःच्या नावावर बँकेच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या गुंतवणुका केल्या असतील…. मिळकती घेतल्या असतील…. यावर समिती नेमून चौकशी आयोग बसवता येऊ शकते…. कुठे शेअर मार्केटमध्ये गुंतवले असतील…. कुठे गोल्ड मध्ये किंवा इतर धातूमध्ये गुंतवले असतील…. ते विकून ठेवीदारांच्या ठेवी देता येऊ शकतात… तरीही इन्शुरन्स ला पुढे करतात….. काही निर्बंध लादून अशा बँका बंद होण्याआधीच पूर्ववत चालू केल्या जाऊ शकतात… बँकेच्या संचालकांनी RBI विरुद्ध सुप्रीम कोर्टात जाऊन दाद मागितले जाऊ शकते… ठेवीदारांचे हित जोपासले जाऊ शकते…. तरीही सारे अलबेल आहे…
*दया कुछ तो बडबड आहे…*
हा झाला ट्रेलर…. पिक्चर अजून पुढे रंगणार आहे… तोही सांगून टाकतो… अशा बँकातून कर्ज घेतलेले कर्जदार खुश असतात…. बरं झालं बँक बुडाली असं वाटतं…. पण हे मुरलेले मुरंबे आहेत… ते तुम्हाला इतक्या सहजासहजी सोडत नाहीत… संचालक व RBI वाले अशा कर्जदारांकडून कर्ज वसूल करण्यासाठी…. सहा महिन्यानंतर एक पत्र काढून आमकी तमकी बँक अवसायनात गेली असे जाहीर करतात…. त्यावर अवसावक नेमून RBI ची टीम कार्यरत करतात… या अवसायकाला अशा कर्ज वसुलीसाठी कर्जदारांच्या मागे लावतात…. ठेवीवर बोलायचं नाही…. असा पवित्र घेतलेले हे अवसायक कर्जदाराच्या मागे हात धुवून लागतात…
इतिहास आठवला…. तर सारं काही क्लिअर होतं…. परंतु माणसाला विसरण्याची कला अवगत आहे… त्यामुळे तो फक्त वर्तमानाचा विचार करतो…. भूतकाळात काय झाले याच्याशी त्याला काही देणे घेणे नाही असे वागतो…. भविष्यात असे काही घडेल… यापासून तो सुप्त राहतो…. म्हणूनच अशा संचालकांची व RBI वाल्यांची किंबहुना सरकारची तिजोरी भरते….
पूर्वी ED च्या माध्यमातून एका कुटुंबाची झाडाझडती घेतली जायची…. व त्या कुटुंबाला देशोधडीला लावायचं… गरिबीच्या न भरून येणाऱ्या पोकळीमध्ये ढकलून द्यायचं… नंतर त्यांना किंवा त्यांच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला रेशन दुकानाच्या लाइनिंग मध्ये आणून उभं करायचं…. नंतर निवडणुकीच्या काळात आम्ही तुम्हाला रेशन देतो, तुम्ही आम्हाला निवडून द्या असं म्हणून आमच्याच पोरा बाळांना कानाचे पडदे फाटेस्तोवर ऐकवायचं….
असा पॅटर्न राबवण्याचा लेटेस्ट व्हर्जन म्हणजे RBI च्या माध्यमातून लाखो लोकांना एकाच वेळी देशोधडीला लावायचं…. पुन्हा तेच चक्र सुरू होणार… परत निवडणूक येणार… आम्ही काही केलं नाही अशी बाचा करायची… नंतर पुन्हा सारं अलबेल….
*दया कुछ तो बडबड आहे…*
माझं काही समर्थ बँकेत खातं नाही… तरीही ठेवी ठेवलेल्या माझ्या निष्पाप बांधवांबद्दल तळमळ आहे म्हणून हा लेख लिहिला आहे. *आम्ही घातलं तर दरोडा… यांनी घातलं तर निर्बंध…. वा रे तेरी लीला*
हिंदू च्या राज्यात हिंदूंनाच संपवण्याचं…. आर्थिक दृष्ट्या कमकुवत करण्याचं…. फार मोठं षडयंत्र होत आहे…
या लेखामुळे काही खातेदारांचे डोळे उघडले, तरी मी धन्य पावलो असे मानेन… यापुढे एकाच बँकेत ठेवी ठेवू नका…. मोठ्या रकमेच्या तर ठेवी अजिबात ठेवू नका… हे सरकार पैशाच्या मागे झपाटलेला आहे…. सर्वसामान्यांनी सावध पवित्रा घेणे…. डोळे उघडे ठेवून व्यवहार करणं… या आजच्या वर्तमान घडीला फार महत्त्वाचा आहे… आर्थिक व्यवहार करताना… अधिक जोखीम गेल्या काही काळात ओढले गेले आहेत हे बऱ्याच माध्यमातून निदर्शनास आलेले आहे… तरी सर्वसामान्य नागरिकांनी सावध असणं ही काळाची गरज आहे… *नाहीतर बळीचा बकरा झालाच म्हणून समजा…* धन्यवाद.






