कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ कोटींचा धनादेश सुपूर्त!
शेतकऱ्यांना मदतीचा हात- अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा उपक्रम.
बार्शी (प्रतिनिधी)
अतिवृष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा कठीण परिस्थितीत शासन व विविध संस्था शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ्या राहत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समिती, बार्शी यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रुपये १ कोटींचा धनादेश सुपूर्त करण्यात आला आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार राजाभाऊ राऊत यांचा पुढाकार मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे हा धनादेश सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब व माजी आमदार राजाभाऊ राऊत यांनी सुपूर्द केला. शेतकऱ्यांच्या अडचणी ओळखून बाजार समितीने मदतीचा हात पुढे केला असून, याबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.
बार्शीतून १ कोटी २९ लाखांची मदत मुख्यमंत्री निधीसाठी बार्शी तालुक्यातील विविध समाजसेवी संस्था, डॉक्टर, उद्योजक, व्यापारी व संघटना यांनी देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी योगदान दिले आहे. आत्तापर्यंत बार्शी तालुक्यातून एकूण₹१,२९,०३,२११ इतकी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जमा झाली आहे.
शेतकऱ्यांसाठी एकजुटीचा संदेश
बार्शी तालुक्यातील सर्व घटकांनी मिळून केलेल्या या सामूहिक प्रयत्नामुळे ” शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकजुटीने उभे राहण्याचा’ प्रेरणादायी संदेश समाजाला मिळाला आहे.
संपर्क: संपादक दत्ता सुरवसे – 9359665644






