बार्शीत मुस्लिम बिरादार संस्थेच्या वधू-वर मेळाव्याला जबरदस्त गर्दी!
— गरीब आणि मध्यमवर्गीय मुला-मुलींसाठी ठरला मोठा फायदा
बार्शी (५ ऑक्टोबर २०२५):
बार्शी शहरात मुस्लिम बिराजदार संस्था यांच्या पुढाकाराने भरवण्यात आलेल्या ऑल मुस्लिम वधू-वर परिचय मेळाव्याला आज प्रचंड प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच लोकांची रांग लागली होती. हजारो लोकांनी आपल्या मुला-मुलींचे बायोडाटा घेऊन हजेरी लावली. या मेळाव्यात ३४९ मुली आणि ४८५ मुलं आली होती.
गरीब समाजासाठी मोठी सोय
संस्थेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष हाजी इकबाल शेठ पटेल म्हणाले, “आपल्या मुस्लिम समाजात बऱ्याच वेळा गरीब आणि मध्यमवर्गीय घरांनं योग्य स्थळ मिळत नाही. त्यामुळे हा मेळावा ठेवला, जेणेकरून सगळ्यांना एकाच ठिकाणी स्थळे बघायला मिळतील.”
या मेळाव्यात नोंदणी मोफत होती, त्यामुळे सर्वसामान्य लोकांनीही मोठ्या संख्येने भाग घेतला.
मान्यवरांची उपस्थिती
या मेळाव्याला महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे चेअरमन ना. समीर गुलाब नबी काजी, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीमभाई बुऱ्हाण तसेच इतर मान्यवर, पत्रकार आणि समाजसेवी उपस्थित होते.
समीर काजी म्हणाले, “अशा मेळाव्यांनी गरीब मुलं-मुलींसाठी नवी वाट खुली होते. असे कार्यक्रम प्रत्येक तालुक्यात व्हायला हवेत.”
️ मेहनतीमुळे मिळाले यश
या मेळाव्याचं यश हे संस्थेच्या सदस्यांच्या मेहनतीमुळे मिळालं. पंधरा दिवस सगळ्या सदस्यांनी गावोगावी, तालुक्यात, जिल्ह्यात फिरून लोकांना मेळाव्याचं आमंत्रण दिलं, पत्रिका वाटल्या, आणि सगळ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिलं. या कष्टाचं फळ म्हणजे आजचा हा प्रचंड प्रतिसाद!
संस्थेच्या सदस्यांचा मोठा सहभाग
या उपक्रमात संस्थेचे सदस्य आणि कमिटी मेंबर खूप उत्साहाने कामाला लागले होते. त्यात रफीक सातारकर, सादीक मुल्ला, इब्राहिम काझी, सलीम शेख, झाकीरहुसेन शेख, वसीम पठाण, अख्तर शेख, वाहिदपाशा शेख, अॅड. सर्फराज मुजावर, अॅड. रियाज शेख, जाफर शेख, अकीब पठाण, एजाज शेख, मुसा मुलानी, पत्रकार जमीर शेख, इस्माईल पटेल, शकील मुलानी, पत्रकार रियाज पठाण, आबेदअली सय्यद, शहानवाज मुल्ला, उस्मान अली शाह, रॉनी सय्यद, सादिक काझी, फिरोज पठाण, ईरफान शेख, साजन शेख, इम्रान झारेकरी, अब्बास शेख, अय्याज शेख, शकील झारेकरी यांचा विशेष सहभाग होता.
दिनांक: रविवार, ५ ऑक्टोबर २०२५
वेळ: सकाळी ११ ते संध्याकाळी ५
ठिकाण: आदित्य कृष्णा मंगल कार्यालय, उपळाई रोड, बार्शी येथे आयोजित करण्यात आला
मेळावा यशस्वीरीत्या पार पडल्याने संस्थेचे अध्यक्ष हाजी इकबाल शेठ पटेल यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आणि पुढेही अशा मेळाव्यांचे आयोजन करत राहण्याची ग्वाही दिली.
मुख्य संपादक दत्ता सुरवसे ✒️