spot_img
spot_img
spot_img
spot_img

देवगिरी 

देवगिरी

शासकीय बंगला, मलबार हिल्स, मुंबई.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भटके विमुक्त (VJNT) सेलच्या वतीने भटक्या विमुक्त जाती जमातींच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सोमवार, दि.३१ ऑगस्ट २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मंत्रालयासमोर, मुंबई येथे “भटके विमुक्त परिषद व सन्मान सोहळा” आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्याचे निमंत्रण आज आमच्या नेत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांना भेटून दिले आदरणीय वहिनी यांनी लोकनेते स्व.अजित दादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देत अजित दादांनी भटक्या विमुक्त समाजासाठी केलेल्या कार्याबाबत चर्चा केली.

हा सोहळा आयोजित केल्याबद्दल आमचे सर्वांचे अभिनंदन करत सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले. यावेळी सहकारी व सेलचे प्रदेश उपाध्यक्ष ठाकूरसिंग बावरी, प्रदेश उपाध्यक्ष माजी न्यायाधीश ॲड. सचिन जोरे,प्रदेश उपाध्यक्ष अंबादास धनगर उपस्थित होते.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*

*सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*   बार्शी : सरपंच म्हणजे आजची युवा शक्ती, आणि...

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!