spot_img
spot_img
spot_img
spot_img

नागपूर

📍नागपूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) तसेच मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल अंतर्गत नागपूर स्पोर्ट्स हब प्रकल्प बांधकामाचा प्रत्यक्ष पाहणी करुन आढावा घेतला.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शल्यचिकित्साशास्त्र विभाग, नेत्र विभाग यांच्या मॅाड्युलर ओ.टी., सिकलसेल व थॅलेसेमिया कक्षाची पाहणी केली. तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी वसतिगृह इमारतीला भेट देत त्यांनी पाहणी केली.

 

रुग्णांना दर्जेदार #आरोग्यसेवा मिळाली पाहिजे आणि #वैद्यकीयशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या पायाभूत सुविधा व शिक्षण मिळाले पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. कामाच्या दर्जाकडे लक्ष देण्याची गरज आहे. विशेषतः मेयो रुग्णालयातील वसतिगृहाचे सुरू असलेल्या बांधकामाकडे विशेष लक्ष द्या, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना पाहणीदरम्यान दिल्या.

 

यावेळी आमदार प्रवीण दटके, महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मेयोचे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन शेंडे यांच्यासह संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!