spot_img
spot_img
spot_img
spot_img

उत्तर सोलापूर | इंद्रजीत पवार,बोराडेंना जनतेचा भक्कम पाठिंबा; दिलीप माने यांचे विजयी करण्याचे आवाहन

उत्तर सोलापूर | इंद्रजीत पवार,बोराडेंना जनतेचा भक्कम पाठिंबा; दिलीप माने यांचे विजयी करण्याचे आवाहन

 

उत्तर सोलापूर /प्रतिनिधी

 

उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये आयोजित बैठकींत माजी आमदार दिलीप माने यांनी जिल्हा परिषद उमेदवार इंद्रजीत पवार आणि मार्डी ग्रामपंचायत समितीच्या उमेदवार तेजस्विनी अमोल बोराडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले. बीबीदारफळ, तळेहिपरगा, हगलूर, एकरूख, तरडगाव, भोगाव, बाणेगाव आणि मार्डी या गावांमध्ये झालेल्या जनसंवाद बैठकीत माजी आमदार माने बोलत होते.

 

या वेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजी पवार, माजी आमदार यशवंत माने तसेच बाजार समितीचे संचालक अविनाश मार्तंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित नेत्यांनी इंद्रजीत पवार यांनी आजवर गावांमध्ये रस्ते, वीजपुरवठा, पाणी योजना तसेच विविध विकासकामे प्रभावीपणे राबवल्याचा उल्लेख केला.

 

“गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आतापर्यंत जे काम झाले, त्याला गती देण्यासाठी पुन्हा एकदा इंद्रजीत पवार आणि तेजस्विनी बोराडे यांना निवडून देणे गरजेचे आहे,” असे आवाहन शहाजी पवार यांनी केले.

 

या बैठकीस संध्याराणी पवार, काशिनाथ कदम, संभाजी धडे, विनायक सुतार, आदर्श युवराज पवार, गणेश पवार, रंगनाथ गुरव, भिंगारे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी विकासाच्या मुद्द्यांवर एकत्र येत उमेदवारांना भक्कम पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!