spot_img
spot_img
spot_img
spot_img

सोलापूरकरांसाठी सुख्या-ओल्या माव्यांची मेजवानी : सात रस्त्यावर ‘ड्राय फ्रुट हाउस’चे भव्य दालन खुले

सोलापूरकरांसाठी सुख्या-ओल्या माव्यांची मेजवानी : सात रस्त्यावर ‘ड्राय फ्रुट हाउस’चे भव्य दालन खुले

 

सोलापूरकरांसाठी सुख्या आणि ओल्या माव्याचे भव्य दालन आता खुले झाले असून सात रस्ता परिसरात, चंदूकाका सराफ यांच्यासमोर आणि सुधा इडली ग्रहच्या शेजारी ‘ड्राय फ्रुट हाउस’ या नावाने हे नवीन दालन सेवेत दाखल झाले आहे.

 

या दालनामध्ये देश-विदेशातून आणलेले तब्बल अडीचशेहून अधिक प्रकारचे दर्जेदार ड्रायफ्रूट्स सोलापूरकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दर्जा, चव आणि ताजेपणा यावर विशेष भर देण्यात आला असून ग्राहकांना एकाच ठिकाणी विविध पर्याय मिळणार आहेत.

 

याशिवाय वेगवेगळ्या देशांतील प्रसिद्ध आणि आकर्षक चॉकलेट्सचीही मोठी रेंज येथे उपलब्ध असणार आहे. त्यामुळे ड्रायफ्रूट्ससह चॉकलेटप्रेमींनाही या दालनाचा खास लाभ होणार आहे.

 

यश डेव्हलपर्सचे डायरेक्टर सुयश खानापुरे यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे दालन हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष उपयुक्त ठरणार आहे.थंडीच्या दिवसांत आरोग्यदायी आणि पौष्टिक आहारासाठी या उत्कृष्ट ड्रायफ्रूट्सचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुयश खानापूरे,

आप्पासाहेब हणमशेट्टी, मयूर दरगड, संदीप शिंदे, यांनी केले आहे.यावेळी खालील सय्यद, बापूसाहेब पाटील, नर्सिंग बायस ,महेश हिरेमठ आणि मल्लिनाथ घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Previous article
Next article

Related Articles

सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*

*सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*   बार्शी : सरपंच म्हणजे आजची युवा शक्ती, आणि...

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!