spot_img
spot_img
spot_img
spot_img

राष्ट्रीय महामार्ग 52 अलर्ट: बीड–तुळजापूर प्रवाशांनी अत्यंत सतर्क राहावे!

राष्ट्रीय महामार्ग 52 अलर्ट: बीड–तुळजापूर प्रवाशांनी अत्यंत सतर्क राहावे!

 

#HighwayAlert #Beed #Tuljapur #SafetyWarning

 

राष्ट्रीय महामार्ग ५२ (बीड–तुळजापूर) मार्गावर गेल्या काही दिवसांत लुटमार, दरोडे, चोरटी हालचाल आणि मालवाहतूक वाहनांवर हल्ल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

बीड पोलीस व महामार्ग सुरक्षा पथकाने अत्यंत महत्वाचा सतर्कतेचा इशारा जाहीर केला आहे.

 

‘१० अतिधोकादायक ठिकाणांची’ यादी (Hotspots of Crime):

 

⛔ या ठिकाणी रात्री अत्यंत जपून प्रवास करा —

1️⃣ मांजरसुंबा घाट (बीड)

2️⃣ चौसाळा बायपास

3️⃣ पारगाव बायपास

4️⃣ सरमकुंडी फाटा

5️⃣ इंदापूर फाटा

6️⃣ पार्डी फाटा

7️⃣ घुले माळ उड्डाणपूल परिसर

8️⃣ तेरखेडा–येडशी टोल नाका

9️⃣ येडशी बायपास

धाराशिव–तुळजापूर मुख्य महामार्ग

 

हे सर्व भाग रात्रीच्या वेळी निर्मनुष्य, अंधारे आणि पोलीसांनी लक्ष्य केलेल्या विशेष धोकादायक पट्ट्यात मोडतात.

 

⚠️ चोरट्यांची लुटमार करण्याची पद्धत (Modus Operandi) — अत्यंत धोकादायक!

 

1. कृत्रिम अपघात घडवून लुटमार

 

चोरट्यांकडून रस्त्यावर अचानक जॅक , खिळे असलेली लाकडी काठी,ओंडके टाकून अपघाताची परिस्थिती निर्माण केली जाते.

त्यानंतर “मदत” करण्याच्या बहाण्याने लुटमार.

 

2. शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी

 

वाहन थांबवून चाकू/काठ्यांनी धमकावून थेट हल्ला.

 

3. दुचाकीस्वारांना विशेष टार्गेट

 

• मागे बसलेल्या व्यक्तीला ओढून पाडणे

 

• चेन स्नॅचिंग

 

• पाठलाग करून जबरी मोबाईल, पर्स चोरी

 

4. जनावरे रस्त्यावर सोडून वाहन रोखणे

 

वाहनाची गती कमी होताच रस्त्याच्या कडेला दबा धरलेल्या टोळीकडून हल्ला.

 

5. ठिबक पाईपचे खोटे गतिरोधक तयार करणे

 

गाडी सावधपणे जात असताना अचानक हल्ला.

 

6. डिझेल चोरी – मालवाहतूक वाहनांचा धोका

 

पेट्रोल पंप किंवा ढाब्यांजवळ थांबलेल्या ट्रकच्या टाक्या रिकाम्या करणे.

 

7. दुभाजकातील झुडपात लपून अचानक हल्ला

 

हे प्रकरण सर्वांत धोकादायक:

वाहन दुभाजकाजवळून गेल्यावर अचानक हल्ला.

 

️ प्रवाशांसाठी महत्वाच्या सुरक्षाविषयक सूचना:

 

✔️ 1. निर्मनुष्य भागात वाहन थांबवू नका

 

जरी काही संशयास्पद वस्तू दिसल्या तरी थांबू नका.

 

✔️ 2. रात्री एकटे प्रवास टाळा

 

शक्यतो Convoy पद्धतीने — दोन-तीन वाहनांसोबत प्रवास करा.

 

✔️ 3. दुभाजकापासून सुरक्षित अंतर ठेवा

 

कडेला झुडपे असतील तर विशेष सतर्कता.

 

✔️ 4. मदत मागण्याऐवजी प्रकाशमान ठिकाणी पोचा

 

जवळचे ,

 

• पेट्रोल पंप

 

• ढाबा

 

• टोल प्लाझा

याठिकाणी आश्रय घ्या.

 

✔️ 5. वाहनाच्या लॉक व कॅमेऱ्यांची तपासणी करा

 

ट्रक, बस चालकांनी विशेष काळजी घ्यावी.

 

पोलिसांची कडक कारवाई व गस्ती वाढविली!

 

• बीड पोलीसांनी महामार्गावर ७ गस्ती वाहने तैनात केली आहेत.

ट्रॅफिक पेट्रोलिंग रात्री विशेष वाढविण्यात आले आहे.

 

तत्काळ मदतीसाठी संपर्क क्रमांक:

 

डायल 112 — तात्काळ मदत

 

पो.नि. शंकर शिंदे (वाशी) — 93551 00100

सपोनि गोसावी (नेकनूर) — 90090 08070

सपोनि भालेराव (येरमाळा) — 94043 35333

सपोनि निशीकांत शिंदे (महामार्ग सुरक्षा) — 98500 90833

 

जनहितार्थ सूचना:

 

हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

एक शेअर कदाचित कोणाचा तरी जीव वाचवू शकतो!

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!