spot_img
spot_img
spot_img
spot_img

रोटरी मेगा मेडिकल मिशन 2025 “सुदृढ बालक, सशक्त भारत”

रोटरी मेगा मेडिकल मिशन 2025

“सुदृढ बालक, सशक्त भारत”

 

सोलापूर, 2025: रोटरी क्लब ऑफ सोलापूर, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, सोलापूर आणि लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय (बाल शल्यचिकित्सा विभाग), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत बालरुग्ण शस्त्रक्रिया शिबिर मोठ्या उत्साहात सुरू झाले.

 

शिबिराचे उद्घाटन डॉ. वर्षा डोईफोडे (जिल्हा शल्यचिकित्सक), डॉ. पारस कोठारी (प्रमुख, बालशल्यचिकित्सा विभाग, लोकमान्य टिळक रुग्णालय, मुंबई), वैद्यकीय अधिकारी डॉ. अग्रजा चिटणीस-वरेरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री ढवळे, डॉ. आशा घोडके, रोटरी जिल्हा ३१३२ चे प्रांतपाल सुधीर लातुरे, २०२६-२७चे प्रांतपाल जयेश पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

या शिबिरात पहिल्या दिवशी सुमारे १०० बाल रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.

यामध्ये जीभ टाय, फिमोसिस, हर्निया, अवांतरित अंडकोष, नाभी हर्निया आणि सिस्ट यांसारख्या शस्त्रक्रिया नियोजित आहेत.

 

मुंबईच्या लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम विशेषतः या शिबिरासाठी सोलापूरला दाखल झाली असून, जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर आणि स्टाफ यांच्या सहकार्याने पुढील दोन दिवस शस्त्रक्रिया पार पडणार आहेत.

 

पी. पी. पटेल फाउंडेशन तर्फे सर्व रुग्णांच्या औषधोपचाराची जबाबदारी घेतली असून, पालकांसाठी मोफत निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या शिबिरासाठी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ वेल्फेअर फंडचेही अर्थसहाय्य प्राप्त झाल्याचे अध्यक्षा धनश्री केळकर यांनी सांगितले.

 

सोलापूर जिल्ह्यासाठी ऐतिहासिक उपक्रम – सोलापूर जिल्ह्यातील विविध गावांमधून बालरुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. अशा मोठ्या प्रमाणावर मोफत बालरुग्ण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन ही सोलापूरसाठी ऐतिहासिक घटना आहे, असे प्रतिपादन डॉ. वर्षा डोईफोडे (जिल्हा शल्यचिकित्सक) यांनी केले. रोटरीद्वारे होणारे सहकार्य वाखाणण्याजोगे असून, भविष्यातही जिल्हा रुग्णालय अशा सामाजिक उपक्रमांसाठी संपूर्ण सहकार्य करेल, असेही त्या म्हणाल्या.

 

डॉ. पारस कोठारी यांनी संयोजकांच्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक करताना, लोकमान्य टिळक रुग्णालयाची टीम वर्षातून दोन वेळा सोलापूरला येण्यास तत्पर आहे, असे आश्वासन दिले.

 

सुधीर लातुरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. समाजातील गरजा ओळखून त्या प्रमाणे प्रकल्प घेण्याचे आवाहन केले. जयेश पटेल यांनी अशा समाजोपयोगी उपक्रमांसाठी पी. पी. पटेल फाउंडेशन पुढेही संपूर्ण सहकार्य करेल, असे प्रतिपादन केले व याप्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. या उपक्रमामुळे अनेक निरागस चेहऱ्यांवर हास्य फुलणार आहे, आणि भविष्यातही अशा आरोग्य सेवा प्रकल्पांचे आयोजन करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.

 

उत्कृष्ट नियोजन आणि समर्पित योगदान – या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. चंद्रकांत क्षीरसागर, डॉ. श्रीकांत कुलकर्णी, डॉ. रोहन वायचळ, तसेच रोटरी क्लब ऑफ सोलापूर, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम टीम आणि जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र यांच्या सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले.

 

अध्यक्षा धनश्री केळकर यांनी सर्वांचे स्वागत केले, तर सचिव निलेश फोफलिया यांनी आभार प्रदर्शन केले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक सीए सुनील माहेश्वरी यांनी केले. रोटे. संदीप जव्हेरी यांनी सूत्रसंचालन केले.

 

कार्यक्रमास सहाय्यक प्रांतपाल जयश्री चव्हाण, डॉ. ज्योती चिडगूपकर, सौ. शांता येळंबकर, सौ. पारुल पटेल, सुहास लाहोटी, मितेश पंचमीया, संतोष कणेकर, शिवाजी उपरे, पराग कुलकर्णी , प्रशांत सिंगी, बी.एस. मुंदडा, राज मिनियार , कालिदास जाजू , विलास कोल्हे, आनंद गुंड्याल, डॉ. सोनाली वळसंगकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

photo lines –

रोटरी क्लब सोलापूर, महिला व नवजात शिशु रुग्णालय, सोलापूर आणि लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय (बाल शल्यचिकित्सा विभाग), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत बालरुग्ण शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*

*सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*   बार्शी : सरपंच म्हणजे आजची युवा शक्ती, आणि...

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!