spot_img
spot_img
spot_img
spot_img

आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म गारमेंट प्रदर्शनात विविध स्टॉल्सना भेटी !

आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म गारमेंट प्रदर्शनात विविध स्टॉल्सना भेटी !

 

मुंबई

 

सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाच्या वतीने यावर्षीचा ९वा आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म गारमेंट फेअर मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. याच निमित्ताने महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मा.श्री. राहुलजी नार्वेकर यांच्यासह या फेअरमध्ये सहभागी होत तेथील विविध स्टॉल्सना भेट दिली.

 

यावेळी फेअरमध्ये सहभागी झालेल्या विविध स्टॉल्सना भेट देत उद्योजक व उत्पादकांशी संवाद साधला. या प्रदर्शनामध्ये १५०हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रँड्स सहभागी झाले असून ३० हजार युनिफॉर्म डिझाईन्स व १५ हजार फॅब्रिक इनोव्हेशन्सचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी नव्या तंत्रज्ञानाचा वापर, दर्जा व नवनवीन संकल्पना पाहून सोलापूरच्या वस्त्रोद्योग क्षेत्राचा बदलते स्वरुप अधिक ठळकपणे जाणवले.

 

सोलापूरचा रेडिमेड वस्त्रोद्योग आज स्थानिक बाजारापुरता मर्यादित न राहता देश-विदेशातील बाजारपेठा गाठू लागला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उत्पादकतेमुळे सोलापूरचा वस्त्रोद्योग ब्रँडिंगच्या दिशेने पुढे जात आहे. अशा फेअर्समुळे उद्योजकांना नव्या ग्राहकांशी थेट संपर्क, निर्यातवृद्धीस चालना आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर स्थान मिळते. सोलापूरसह महाराष्ट्रातील कापड व्यवसायाला अशा उपक्रमांतून निश्चितच नवे दालन खुले होते आहे, ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*

*सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*   बार्शी : सरपंच म्हणजे आजची युवा शक्ती, आणि...

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!