spot_img
spot_img
spot_img
spot_img

स्व. विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे २६ जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा!

स्व. विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे २६ जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा!

 

लिंगराज वल्याळ मैदान सोलापूर 26 नोव्हेंबर 2025

 

गोरज मुहूर्तावरची लगबग….मंगलवाद्यांचे सूर…आणि अनुपम्य असा सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी जमलेले हजारो वऱ्हाडी अशा वातावरणात आज बुधवारी स्व. विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे २६ जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा अत्यंत आनंदी वातावरणात संपन्न झाला.

 

सोलापूर येथील लिंगराज वल्याळ मैदानावर झालेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्यास माझ्यासोबत या विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमाचे संयोजक सोलापूर मध्य चे युवा आमदार देवेंद्र राजेश कोठे, आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

स्व. विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे यंदाचे दुसरे वर्ष होते. प्रारंभी २६ जोडप्यांना सजवलेल्या बग्गीत बसवून शहरातून थाटात वरात काढण्यात आली. स्व. लिंगराज वल्ल्याळ क्रीडांगणापासून सुरुवात झालेली ही वरात सत्यम चौक- साईबाबा चौक – ७० फूट रस्ता – संत तुकाराम चौक – अशोक चौक – वालचंद महाविद्यालय – कर्णिक नगरमार्गे पुन्हा स्व. लिंगराज वल्याळ क्रीडांगणावर आली. या ठिकाणी नव वधू-वरांचे हजारो वऱ्हाडींनी मोठ्या आनंदात स्वागत केले. सायंकाळी ५.४२ वाजताच्या गोरज मुहूर्तावर २६ नव्या वधू-वरांचा सामुदायिक विवाहसोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 

पद्मशाली पुरोहित संघम वेदपाठशाळेच्या श्रीनिवास म्याडम पंतलु आणि आत्माराम चिप्पा पंतलू यांच्या मार्गदर्शनाखाली पुरोहितांनी मंत्रोच्चारात सर्व विवाह विधी करवून घेतले. अक्षता पडताच ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली. स्व. विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे सर्व नववधूंसाठी एक मणी मंगळसूत्र, जोडवे, हार, बाशिंग, शालू, गजरे, गुच्छ, चप्पल तर वरांसाठी जोधपुरी कपडे, फेटा, हार, बाशिंग, गुच्छ, बूट देण्यात आले. तसेच वधूवरांसाठी बाळकृष्ण, कपाट, स्टीलची पाण्याची टाकी, कळशी, ५ ताट, वाट्या, पेले, प्लेट, बादली, परात, तांब्या तसेच अन्य संसार उपयोगी साहित्यही देण्यात आले.

 

विवाहस्थळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात वऱ्हाडीनी यावेळी रक्तदान केले. डॉ. हेडगेवार रक्तपेढीने रक्तसंकलन केले.

 

स्व. विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानच्या या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी मैंदर्गी मठाचे अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरू,सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, डॉ. सूर्यप्रकाश कोठे, शहाजी पवार, अविनाश महागावकर,

भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रंजिता चाकोते, देवेंद्र भंडारे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, पद्माकर काळे, प्रथमेश कोठे, विनायक कोंड्याल, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, श्रीनिवास करली, गुरुशांत धुत्तरगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड, राजकुमार हंचाटे, उमेश गायकवाड, मेघनाथ येमुल, श्रीनिवास पुरुड, राधिका पोसा, सुनिता कामाठी प्रतिमा मुदगल, श्रीकांत डांगे, केदार उंबरजे, दशरथ गोप, सत्यनारायण बोल्ली, ब्रिजमोहन फोफलिया, पेंटप्पा गड्डम, बाळासाहेब वाघमारे, मोनिका कोठे, धनश्री कोंड्याल, राधिका चिलका, भाजपाचे शहर उपाध्यक्ष मोहन डांगरे, श्रीनिवास दायमा, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विजय कुलथे, त्याचबरोबर भाजपाचे माजी नगरसेवक, नगरसेविका तसेच भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी राजकीय, प्रशासकीय, धार्मिक, सांस्कृतिक, शिक्षण, वैद्यकीय, पत्रकारिता, विधी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

विवाह सोहळ्याच्या उत्साहाला सुमधुर संगीताचीही जोड मिळाली. पद्मश्री संगीत विद्यालय प्रस्तुत ‘सुर तेची छेडिता’ हा कार्यक्रम साक्षी देवस्थळी, स्नेहल जोशी यांनी सादर केला. यावेळी त्यांनी विविध मराठी, तेलगू, हिंदी गीते सादर करून उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या.

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

 

Related Articles

सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*

*सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*   बार्शी : सरपंच म्हणजे आजची युवा शक्ती, आणि...

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!