spot_img
spot_img
spot_img
spot_img

सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज शहरातील महत्त्वाच्या विकासकामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज शहरातील महत्त्वाच्या विकासकामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

 

भैया चौक येथील रेल्वे ब्रिज पाडण्यात येणार असून त्या ठिकाणी पर्यायी मार्ग म्हणून ५४ मीटरचा रस्ता सुरु करण्याबाबत आज मध्य रेल्वे सोलापूरचे मंडल रेल प्रबंधक डॉ. सुजीत मिश्रा यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान पर्यायी मार्ग त्वरित सुरू करण्याबाबत आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी भर दिला. तसेच टिकेकरवाडी येथील रेल्वे स्टेशन विस्तारिकरण होणार असून त्या स्टेशन ला जोडणाऱ्या रस्ता परिसराला कुमठा गाव व होटगी रोडशी जोडणाऱ्या अप्रोच रोड संदर्भातही चर्चा करण्यात आली.

 

त्यानंतर आयुक्तांनी ६ कामना येथील नाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. या कामामुळे परिसरातील पावसाचे पाणी नाल्यातून सहज प्रवाहित होईल आणि पाणी साचण्याची समस्या दूर होईल, असे त्यांनी सांगितले.

 

यानंतर स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या एडवेंचर पार्क ला नागरिकांसाठी खुले करण्यात आले असून, त्या ठिकाणी भेट देऊन आयुक्तांनी पार्कमधील सुविधा, सुरक्षा व्यवस्था व देखभालीसंदर्भात तपासणी केली. तसेच पार्क परिसर अधिक आकर्षक व सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित विभागाला दिल्या.

 

त्यानंतर त्यांनी रंगभवन प्लाझा येथे पाहणी करून परिसरातील स्वच्छता, प्रकाशयोजना आणि सुशोभीकरणाच्या कामांची माहिती घेतली.

 

शेवटी, समाचार चौक येथे सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामांची आयुक्तांनी पाहणी केली. या ठिकाणी सुंदर सीटिंग एरिया, गार्डन, लाईटिंग आदी सुविधा निर्माण करण्याचे काम सुरु असून, चौक आकर्षक व नागरिकांसाठी विश्रांतीयोग्य बनविण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

या सर्व पाहणीदरम्यान आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी सर्व अधिकाऱ्यांना कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.त्या परिसरातील अतिक्रमण सुद्धा काढण्याचे सूचना दिल्या.यावेळी उपायुक्त आशिष लोकरे, एस. एच. मलभागे- Sr. DEN (Co), योगेश पाटील – व. मंडल वाणिज्य प्रबंधक.ब्रजेश राय- व. मंडल परिचालन प्रबंधक. रामलाल प्यासे Sr. DME, भोसले AEN,नगर अभियंता सारिका आकूलवार,अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, उद्यान प्रमुख स्वप्नील सोलनकर,सागर कुरसेकर आदी मान्यवर उपस्थिती होते.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*

*सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*   बार्शी : सरपंच म्हणजे आजची युवा शक्ती, आणि...

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!