spot_img
spot_img
spot_img
spot_img

ब्रेक फेल झालेल्या एसटी बसने डिव्हायडरवर घेतली धडक; चालकाच्या चातुर्यामुळे मोठा अपघात टळला

ब्रेक फेल झालेल्या एसटी बसने डिव्हायडरवर घेतली धडक; चालकाच्या चातुर्यामुळे मोठा अपघात टळला

 

सोलापूर, दि. ४ नोव्हेंबर — बार्शी सोलापूरकडे येणाऱ्या एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याने बाळे-बार्शी रोडवरील संतोष नगरजवळ भीषण अपघाताचा प्रसंग ओढवला. मात्र चालकाच्या चातुर्यामुळे आणि प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवितहानी न होता मोठा अनर्थ टळला.

 

बार्शी आगाराची एमएच-०६ एस ८३१० क्रमांकाची एसटी बस मंगळवारी सायंकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास संतोष नगर परिसरात आली असता अचानक तिचा ब्रेक निकामी झाला. नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या डिव्हायडरवर चढली आणि डिव्हायडरवर उभ्या असलेल्या पूलाला (धडकली. या धडकेमुळे बसचा तोल जाऊन ती समोरून येणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या खाजगी कारवर कोसळली.

 

सदर कार क्रमांक एमएच-२४ बीएल २२६८ असून, ती कार एका पोलिस कर्मचाऱ्याच्या मालकीची आहे. मात्र बसचालकाने योग्य वेळी वाहनाचा वेग नियंत्रित करण्याचा प्रयत्न केल्याने आणि कार चालकानेही तत्परतेने प्रतिसाद दिल्याने अपघात अधिक गंभीर स्वरूपाचा झाला नाही. या दुर्घटनेत कुणालाही इजा झाली नसून दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे.

 

अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनास्थळी पोलिसांनी तत्काळ धाव घेत वाहतूक सुरळीत केली. या घटनेबद्दल परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला असून, एसटी चालकाच्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!