अकलूज येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने भव्य घोडे बाजाराचे उद्घाटन
अकलूज (प्रतिनिधी) – कृषी उत्पन्न बाजार समिती, अकलूज यांच्या वतीने आयोजित भव्य घोडे बाजाराचे उद्घाटन आज माजी उपमुख्यमंत्री मा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते मा. जयसिंह (बाळदादा) मोहिते-पाटील, मा. मदनसिंह मोहिते-पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार उत्तमराव जानकर, शिवतेजसिंह मोहिते-पाटील, सयाजीराजे मोहिते-पाटील, मामासाहेब पांढरे, सचिव राजेंद्र काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या घोडे बाजारामुळे स्थानिक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना व्यवहारासाठी आपल्या परिसरातच एक सक्षम आणि सोयीचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला.
या निमित्ताने खासदार धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले, “घोड्यांचा बाजार हा केवळ व्यापार नसून आपल्या ग्रामीण परंपरेचा एक सन्मान आहे. या उपक्रमामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांच्या अर्थकारणाला नवा उभारी मिळेल.”
Dhairyasheel Mohite Patil
Ranjitsinh Mohite Patil
उपसंपादक : राजन क्षत्रिय






