spot_img
spot_img
spot_img
spot_img

अतिवृष्टीग्रस्त बीडी कामगारांना न्याय द्या!

अतिवृष्टीग्रस्त बीडी कामगारांना न्याय द्या!

महाराष्ट्र कामगार सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सोलापूर

अतिवृष्टीमुळे सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील वज्रेश्वर नगर भागातील सुमारे २० ते ३० बीडी कामगार कुटुंबीयांना सहाय्यता निधीपासून वंचित राहावे लागले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामे न केल्याने त्यांची नोंद शासन यादीत झालेली नाही.

या कुटुंबीयांना अतिवृष्टी सहाय्यता निधी देण्याची मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

निवेदनात रेखा संजू खुणे, जयश्री किसनसा हबीब, विजया नरेश खुणे, अश्विनी सूर्यवंशी, सुरेखा दास, रेखा आडकी आदी वंचित कुटुंबांची नावे नमूद आहेत.

सदर निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री सोलापूर व महापालिका आयुक्त यांना पाठविण्यात आली आहे.

अतिवृष्टीमुळे सहाय्यता निधीपासून वंचित राहिलेल्या कुटुंबीयांना मदत द्या, अशी मागणीचे निवेदन मा. उपजिल्हाधिकारी अमित भोसले यांना देताना विष्णू कारमपुरी (महाराज), रेखा आडकी, रेखा खुणे, अश्विनी सूर्यवंशी, सुरेखा दास, जयश्री हबीब आदी उपस्थित.

 

उपसंपादक राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!