बार्शीभूषण, ज्येष्ठ धन्वंतरी डॉ. बी.वाय. यादव साहेब यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित संत तुकाराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पानगाव येथे लोक व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
*या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री. आनंद कसबे सर होते. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती गावचे सरपंच श्री. नंदा काका देशमुख बार्शीचे पत्रकार संदीप आलाट पानगावचे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पिंटू नाईकवाडी होते.*
तसेच पानगाव केंद्राचे केंद्रप्रमुख कुलकर्णी सर, मुख्याध्यापिका श्रीमती मीनाक्षी पवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.1 व2 चे शिक्षक व विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री. जगताप सर यांनी लोक व्याख्यानाच्या आयोजनाचा उद्देश सांगितला.
त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. श्री.विशाल गरड यांनी आपल्या व्याख्यानातून शिक्षण, संस्कार व सामाजिक मूल्य यांचे यशस्वी जीवनातील महत्त्व आपल्या ओघवत्या शैलीने व्यक्त करून विद्यार्थी व उपस्थित पालकांना मंत्रमुग्ध केले.
पत्रकार संदीप आलाट तसेच सरपंच नंदा काका देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य श्री. आनंद कसबे सर यांनी अशा संस्कारक्षम वयात विद्यार्थ्यांना त्यांच्या मनात चांगले विचार पेरण्यासाठी अशा व्याख्यानाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
आदर्श पालक म्हणून विद्यालयातील प्राध्यापिका यादव मॅडम, श्री पवार सर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच श्रीमती गायकवाड मॅडम यांचाही सत्कार प्रमुख पाहुणे विशाल गरड यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
संदीप आलाट, काशिनाथ कांबळे तसेच श्री मोळवणे यांच्या तर्फे विद्यालयातील 25 विद्यार्थ्यांना(मठावरील) यावेळी गणवेश वाटप करण्यात आले. सदर गणवेशाच वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री. आनंद कसबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महाले सर यांनी तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री. बांगर सर यांनी केले.
उप संपादक
पिंटू मोरे
✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️