spot_img
spot_img
spot_img
spot_img

इलेक्ट्रो २०२६ ची थाटात सांगता बाबर एजन्सीज – गोदरेज ठरले सर्वोत्कृष्ट स्टॉल पारितोषिकाचे मानकरी  

इलेक्ट्रो २०२६ ची थाटात सांगता बाबर एजन्सीज – गोदरेज ठरले सर्वोत्कृष्ट स्टॉल पारितोषिकाचे मानकरी

 

सोलापूर – होम मैदानावर १२ ते १८ फेब्रुवारी पर्यंत सुरू असलेल्या इलेक्ट्रो या भव्य प्रदर्शनाचा सांगता समारंभ महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने व एअरपोर्ट ऑथॉरिटी चे सहाय्यक सरव्यवस्थापक सौ. अंजनी शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी इलेक्ट्रो २०२६ चे सर्वोत्कृष्ट स्टॉलचे बक्षिस बाबर एजेन्सीज च्या गोदरेज कंपनीच्या स्टॉल ला प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी मंचावर सेडाचे अध्यक्ष डॉ. सुरजरतन धुत, माजी अध्यक्ष आनंद येमुल , चेअरमन जितेंद्र राठी , उपाध्यक्ष भूषण भुतडा, सचिव हरीश कुकरेजा , खजिनदार श्री. सुयोग कालाणी, सह सचिव गिरीश मुंदडा उपस्थित होते .

 

प्रारंभी सोलापूर इलेकट्रोनिक्स डिलर्स असो. चे अध्यक्ष डॉ. सुरजरतन धुत यांनी स्वागतपर प्रास्ताविक करताना सर्व संचालक मंडळ व इलेकट्रो समितीचे सभासदांनी घेतलेल्या परिश्रमाबद्धल आभार व्यक्त करीत ऐतिहासिक आणि विक्रम प्रस्थापित झाल्यामुळे 2026 यशस्वी झाले असे त्यांनी आवर्जून सांगितले. या यशामागे समस्त माजी अध्यक्ष, संचालक मंडळ व सभासद असल्याचे त्यांनी पुढे नमूद केले.

 

इलेक्ट्रो चे चेअरमन जितेंद्र राठी आपल्या भाषणात नागरिकांनी या प्रदर्शनास दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद तसेच मुख्य प्रायोजक व्ही प्लस तर सह प्रायोजक विझी टीव्ही , लक्ष्मी ऑटोमोबाइल्स, अपार केबल्स , हाईफा इलेक्ट्रिकल्स् , शैक्षणिक भागीदार एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी , वित्तीय भागीदार बजाज फायनान्स व इव्हेंट प्रोडक्शन प्रायोजक सॅटिसफाईड मीडिया व उत्सव इव्हेंट यांचे विशेष आभार व्यक्त केले. समस्त स्टॅालधारक, सहभागी कॉलेज विद्यार्थी व सहभागी कंपन्यांचेही विशेष आभार मानले. सात दिवसांत सुमारे एक लाख तीस हजार ग्राहकांनी यंदा प्रदर्शनास भेट दिल्याचे त्यांनी आवूर्जन उल्लेख केला.

श्री सुनील माने यांनी हे प्रदर्शन अत्यंत नियोजनबद्ध असल्याचे सांगत सेडाचे सर्व पदाधिकार्यांच्या एकात्मतेचे कौतुक केले. स्मार्ट मीटर चे फायदे सांगत सर्वांनी स्मार्ट मीटर बसवून घ्यावे असे आवाहन केले.

सौ. अंजनी शर्मा यांनी सुद्धा या उपक्रमाबद्दल संपूर्ण सेडा टीमचे अभिनंदन केले .मुंबई दिल्ली सारख्या मोठ्या शहरातील प्रदर्शना बरोबरीचे हे प्रदर्शन होते . असल्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. तिकीट विक्री केंद्राचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या व्ही. गु. शिवदारे कॉलेज च्या विद्यार्थी विद्यार्थिनींचे विशेष कौतुक करण्यात आले.

 

 

त्यानंतर विविध गटातील पारितोषिक माजी अध्यक्ष आनंद येमुल , खजिनदार सुयोग कालाणी चेअरमन जितेंद्र राठी यांनी जाहीर केले.

 

इलेक्ट्रॉनिकस व होम अप्लायन्सेस (कंपनी फीटेड विभाग) :

प्रथम- सॅमसंग ( कस्तुरे असोसिएट्स )

द्वितीय विभागून – हायर ( बदामीकर अँन्ड सन्स ) व

एलजी ( विजय इलेक्ट्रॉनिक्स आणि आनंद इलेक्ट्रॉनिक्स)

 

इलेक्ट्रॉनिकस व होम अप्लायन्सेस (सेल्फ फिटेड विभाग):

प्रथम- एस.एन. इलेक्ट्रॉनिक्स

व्दितीय – महेंद्र इलेक्ट्रॉनिक्स

 

इलेक्ट्रॉनिकस व होम अप्लायन्सेस (कंपनी टाईप सेल्फ फिटेड विभाग):

प्रथम- चव्हाण ट्रेडिंग ( अकाई )

 

होम अप्लायन्सेस (कंपनी फिटेड विभाग):

प्रथम- सुयोग् डिजिटल ( व्हॉल्टास )

व्दितीय – राठी डिस्ट्रीब्युटर्स ( बॉस )

 

होम अप्लायन्सेस (सेल्फ फिटेड विभाग):

प्रथम- संदीप ट्रेडर्स ( सुजाता)

व्दितीय – श्री स्वामी समर्थ एजन्सी ( उनोवा आटा चक्की )

 

होम अप्लायन्सेस (कंपनी टाईप सेल्फ फिटेड विभाग):

प्रथम- मोनिका इलेक्ट्रॅनिक्स ( सिम्फनी)

व्दितीय- सर्वोदय ट्रेडर्स

 

इलेक्ट्रॉनिकस विभाग (कंपनी फिटेड विभाग) :

प्रथम- श्री ओम इलेकट्रोनिक्स (टीसीएल)

 

इलेक्ट्रॉनिक्स विभाग (सेल्फ फिटेड विभाग) :

प्रथम- अचिंत्य ऑटो मोबाईल्स

 

इलेक्ट्रोनिक्स् विभाग (कंपनी टाईप सेल्फ फिटेड विभाग) :

प्रथम- ओपल कॉम्प्युटर्स ( कॅरियर)

 

आय. टी. व कॉम्पुटर्स विभाग : (कंपनी फिटेड विभाग):

प्रथम – बोट – श्रीजीत सेल्स

 

आय. टी. व कॉम्पुटर्स विभाग : (सेल्फ फिटेड विभाग):

प्रथम – दर्शन इलेक्ट्रॉनिक्स (असुस)

 

सोलर सिस्टम्स (कंपनी विभाग) :

प्रथम- वेदांत इंटरप्रायेस ( टाटा)

 

सोलर सिस्टम्स (सेल्फ फिटेड ) :

प्रथम- चैतन्य आदित्य सोलर शॉपी

 

फिटनेस (सेल्फ फिटेड )

प्रथम – गौरव एजन्सीज

 

वॉटर प्युरिफायर : (सेल्फ फिटेड विभाग):

प्रथम – दोशीबा वॉटर प्युरिफायर

द्वितीय – अक्वाक्युर वॉटर प्युरिफायर

 

फूड स्टॉल

प्रथम -साई फूड स्टॉल

द्वितीय – विठाई पाव रगडा पॅटीस

 

या स्टॉलचे परिक्षण स्टॉलचे परीक्षण इंजिनीयर व आर्किटेक्ट ओमप्रकाश दरक, रघुनंदन भुतडा, सौ. नयना राठी, सीए नंदा भट्टड , योगिन गुर्जर यांनी केले.

 

शेवटी दि.१८ रोजीचे भाग्यवंत क्रमांक काढण्यात आले. सर्वांचे आकर्षक़ ठरलेल्या सात दिवसाचा एकत्रित्त बंपर लकी ड्रॉ ५९८७४ तिकट क्रमाकांस बक्षिस जाहीर करण्यात आला. ह्या भगवंतास आयएफबीची ५१,९९० किमतीची किचन चिमणी भेट मिळणार आहे. शेवटच्या दिवशीचे काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ चे भाग्यंत क्रमांक – प्रथम – 76863

द्वितीय – 75875

तृतीय – 76864 आहेत. विजेत्यांनी सेडा कार्यालय, सुराणा मार्केट येथे स.10 ते 12 यावेळेत 15 दिवसांत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. सचिव हरीश कुकरेजा यांनी आभार प्रदर्शन केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुमारी पायल जाजु यांनी केले.

 

या कार्यक़्रमास संचालक बसवराज नवले, चंद्रकांत शहापुरे ,सुनिल भांजे, सचिन करवा, विजय टेके, रविंद्र पाचलग,तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष केतन शाह, सतीश मालू, शिवप्रकाश चव्हाण, समीर गांधी, विपीन कुलकर्णी , कौशिक शाह, खुशाल देढिया, ईश्वर मालू, दीपक मुनोत सह संदेश कोठारी, यल्लप्पा भोसले ,राजेश जाजू, विश्वजीत कुलकर्णी, सतिश मुंदडा, दत्तात्रय अंबुरे, जॉय छाब्रिया, घनश्याम चव्हाण , संतोष बुरबुरे, राजेंद्र बिराजदार ,ईरफान शेख, संजय नाईक , बसवराज कडगंची , अंगद चव्हाण आदी उपस्थित होते.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!