spot_img
spot_img
spot_img
spot_img

चबुतऱ्यासोबतच बसवण्णांचा पुतळा दुरुस्ती देखील सुरु

चबुतऱ्यासोबतच बसवण्णांचा पुतळा दुरुस्ती देखील सुरु

 

शहर-जिल्ह्यातील बसवप्रेमींनी अचानक केली पाहणी

 

सोलापूर : शहर जिल्ह्यातील बसव प्रेमींनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केल्यानंतर ज्या पद्धतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम सुरू करण्यात आले. त्याचबरोबर पुतळा दुरुस्तीचे देखील काम सुरू करण्यात आल्याची माहिती शहर-जिल्ह्यातील बसवप्रेमींनी त्या कामाची काल शनिवारी अचानक जाऊन पाहणी केली तेंव्हा समजली.

19 मे 2025 ला तो पुतळा महापालिकेने नियुक्त केलेल्या बसव ब्रिगेडच्या देखरेखीखाली व मूर्तिकार महेश शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली चबुतऱ्यावरून हटवून त्यांच्या स्टुडिओमध्ये नेऊन ठेवण्यात आला. मात्र गेली 7 महिने तो पुतळा जैसे थे परिस्थितीत होता. लाक्षणिक उपोषण होईपर्यंत त्या पुतळ्याच्या दुरुस्तीला देखील सुरुवात झाली नव्हती.

मात्र काल शनिवारी बसव प्रेमींनी अचानक त्यांच्या स्टुडिओला भेट दिली. तेव्हा पुतळ्याच्या दुरुस्तीला प्रारंभ झालेला दिसून आला. यंत्राच्या साह्याने पुतळ्यावर जमलेला रंगांचा थर हटवण्याचे काम सुरू होते.

यावेळी उपस्थित बसवप्रेमींना मूर्तिकार महेश शहाणे यांनी सांगितले की पहिल्यांदा पुतळ्यावरील रंगाचा थर हटवणार. त्यानंतर ज्या ठिकाणी पुतळ्याला भेगा आहेत. त्या भेगा ब्रांझ धातूच्या साह्याने बुजवून घेणार. पुतळ्याच्या धडाचा भाग आणि कमरेच्या भागादरम्यान मोठी फट राहिली होती. त्यातून पावसाचे पाणी पुतळ्यामध्ये जात होते. त्यामुळे पुतळ्याची झीज होण्यास प्रारंभ झालेला होता. ती फट देखील ब्रांझ धातूच्या साह्याने बुजवून घेण्यात येणार आहे. सर्वात शेवटी पुतळ्याला रंगकाम केले जाणार आहे.

यावेळी बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, वीरशैव व्हिजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार, बसव ब्रिगेड शहर सचिव राहुल जत्ती, सहसचिव अविनाश बिराजदार, लक्ष्मीकांत बिराजदार, मल्लाडे, अभिषेक पाटील आदी बसवप्रेमी उपस्थित होते.

 

पुतळा मे महिन्यात आमच्या स्टुडिओमध्ये आणण्यात आला होता. आम्ही त्याचे काम सुरू केले आहे. दिड महिन्याच्या आत आम्ही तो पुतळा दुरुस्ती आणि रंगरंगोटी करून चबुतऱ्यावर स्थापन करणार आहोत. तिथे पुतळा 1982 साली स्थापन करताना ज्या स्थितीत होता त्या स्थितीत दिसेल.

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!