📍राज मेमोरियल इंग्लिश स्कूल, सोलापूर
स्व. विष्णुपंत कोठे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या राज मेमोरियल इंग्लिश स्कूल, सोलापूर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा फडकविण्याचे भाग्य लाभले यावेळी शहर मध्य चे आमदार सन्माननीय देवेंद्र दादा कोठे, प्राचार्या रोहिणी सुरा, डॉ. स्वप्नाली बोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रजासत्ताक दिनाचे महत्व त्याच बरोबर भारताची प्रगती, सांस्कृतिक वारसा आणि जागतिक स्तर जपण्याचे आवाहन केले. आपल्या देशाबद्दलची सकारात्मक भूमिका ही आपल्याला देशाचे परम वैभव टिकवण्यासाठी व संकटप्रसंगी एकत्र उभे राहण्यासाठी नक्कीच मदतीला येईल असा आत्मविश्वास व्यक्त केला.
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






