जैन समाजाला स्वीकृत नगरसेवक पद द्या!
सोलापूर जैन समाजाची मागणी
सोलापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. जैन समाज हा नेहमीच भाजपाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असतो समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जैन समाजातील एका व्यक्तीला स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त करावी अशी मागणी जैन समाजाकडून सोलापूरचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे व भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांना जैन समाजातील एका शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे दिले.
सोलापुर शहरातील जैन समाज हा सामाजिक शैक्षणिक धार्मिक व आर्थिक क्षेत्रात नेहमीच विधायक योगदान देणारा कायद्याचे पालन करणारा आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा समाज आहे शहराच्या विकासात जैन समाजाचा सक्रिय सहभाग राहिला श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन व माजी आमदार दिलीप माने साहेब हे समाजाच्या अडीअडचणीला व कोणत्याही कार्याला सतत समाजाच्या पाठीशी असतात. आजही विविध सामाजिक उपक्रमाद्वारे समाज शहराच्या प्रगतीस हातभार लावत आहे. लोकसंख्या सामाजिक योगदान व जबाबदारीची जाणीव लक्षात घेता जैन समाजाला महानगरपालिकेत योग्य स्थान मिळणे अत्यंत आवश्यक आहे समाजाची समाजाची प्रामाणिक भावना आहे. जैन समाजाचा समतोल राखण्यासाठी भाजपने स्वीकृत सदस्य पदाची संधी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






