*जिल्हा मेळावा मध्ये महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश*
सोलापूर भारत स्काऊट गाईड यांच्यावतीने कर्मवीर विद्यालय चारे या ठिकाणी जिल्हा स्काऊट गाईड मेळावा संपन्न झाला. या जिल्हा मेळाव्यामध्ये विविध स्पर्धा पार पडल्या यामध्ये तंबू सजावट, बिनभांड्याचा स्वयंपाक,शेकोटी कार्यक्रम, शोभायात्रा ,सेल्फी पॉईंट,शारीरिक प्रात्यक्षिक, संचलन, रांगोळी, चित्रकला व वेशभूषा इ. वरील सर्व स्पर्धेमध्ये महाराष्ट्र विद्यालय बार्शी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन पुढील प्रमाणे यश संपादन केले.
वेशभूषा स्पर्धा स्काऊट प्रथम क्रमांक सोहम राऊत,
वेशभूषा स्पर्धा गाईड तृतीय क्रमांक प्रतीक्षा आवारी
पोस्ट कार्ड स्पर्धा तृतीय क्रमांक शिवांजली खराडे. तसेच विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धेमध्ये उत्कृष्ट सहभाग नोंदवला. सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक स्काऊट मास्टर योगेश उपळकर, गाईड कॅप्टन व्ही पी चौधरी ,एस व्ही वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल सर्व स्काऊट गाईडचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव, उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी.टी.पाटील, सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य ए.पी. देबडवार , संस्थेचे खजिनदार तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख जयकुमार शितोळे,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ मिराताई यादव,एस.बी. शेळवणे, सर्व कार्यकारिणी सदस्य ,सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या प्राचार्या के.डी.धावणे, पमुख्याध्यापक आर.बी.सपताळे,पर्यवेक्षिका एन.बी.साठे, पर्यवेक्षक के जी मदने, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
मुख्य संपादक : दत्ता सुरवसे






