सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 करीता भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी ज्या कार्यकर्त्यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळालेली नाही, अशा सर्व कार्यकर्ता उमेदवारांनी पक्षहित लक्षात घेऊन आपली उमेदवारी माघार घ्यावी व पक्षाला सहकार्य करावे, जे कार्यकर्ते आपली उमेदवारी माघार घेऊन पक्षाशी निष्ठा राखतील, अशा सर्व कार्यकर्त्यांची पक्षाकडून योग्य दखल घेण्यात येईल. सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाची जबाबदारी ओळखून आपापल्या प्रभागातील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार करावा व पक्षाचे उमेदवार विजयी करण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा.
जे कार्यकर्ते उमेदवारी माघार घेणार नाहीत, त्यांच्यावर पक्षशिस्तीनुसार नाईलाजाने शिस्तभंगाची कारवाई करावी लागेल, याची नोंद घ्यावी.
तसेच सोलापूर शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघांतील विद्यमान आमदारांनी व पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाने जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. प्रदेश पातळीवरून प्रवेश देऊन ज्यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्याबाबत कोणताही गैरसमज किंवा अन्यायाची भावना न बाळगता सर्व भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाच्या निर्णयाला पाठिंबा द्यावा व एकसंघपणे सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.असे आवाहन अध्यक्षा सौ. रोहिणी तडवळकर यांनी केले आहे.
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






