spot_img
spot_img
spot_img
spot_img

भाजपला मोठा धक्का; चव्हाण कुटुंबासह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपला मोठा धक्का; चव्हाण कुटुंबासह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

 

सोलापूर /प्रतिनिधी

 

शहरातील राजकारणात मोठी उलथापालथ घडत भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे पती अनिल चव्हाण व मुलगा आशुतोष चव्हाण यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या समवेत सिद्धार्थ सर्वगोड, राजू काळे, सागर हत्तुरे, सुकेशिनी गंगोडा, चंद्रकांत नवत्रे, किरण सर्वगोड, सुरेखा काळे, श्रीकांत हत्तुरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

 

हा पक्षप्रवेश सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष संतोष पवार, जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील, कार्याध्यक्ष जुबेर बागवान व नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

 

दरम्यान, माजी नगरसेवक अप्पासाहेब हत्तुरे यांचे बहुसंख्य खंदे समर्थकही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाल्याने पक्षाची ताकद अधिक वाढली आहे. अप्पासाहेब हत्तुरे यांचा हद्दवाढ भागात मोठा प्रभाव असून त्यांच्या सोबत कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. त्यांनी स्वतः अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली असून विविध निवडणुकांमध्ये तीन अपक्ष नगरसेवक निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

 

या सलग पक्षप्रवेशांमुळे हद्दवाढ भागात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून भाजपमधून मोठ्या प्रमाणात गळती झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Previous article
Next article

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!