सोलापूर महापालिका निवडणूक : ८५४ अर्जांची विक्री, सहा उमेदवारांचे अर्ज दाखल
सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांच्या विक्रीला मोठा प्रतिसाद मिळत असून निवडणूक प्रक्रियेला जत्रेचे स्वरूप आले आहे. शुक्रवारी, २६ डिसेंबर रोजी एकूण ८५४ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे. मात्र, दिवसअखेर प्रत्यक्ष नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची संख्या सहा इतकी आहे.
निवडणूक निर्णय अधिकारीनिहाय अर्ज विक्रीचा तपशील पाहता अधिकारी-१ कडे १५२, अधिकारी-२ कडे ९१, अधिकारी-३ कडे १२२, अधिकारी-४ कडे १२४, अधिकारी-५ कडे १४८, अधिकारी-६ कडे ५५ तर अधिकारी-७ कडे सर्वाधिक १६२ अर्जांची विक्री झाली आहे.
दरम्यान, दाखल झालेल्या नामनिर्देशन अर्जांमध्ये प्रभाग १२-ब (पुरुष), प्रभाग १०-अ (महिला), प्रभाग १०-ब (महिला), प्रभाग १०-क (पुरुष), प्रभाग १० (पुरुष) आणि प्रभाग ११ (पुरुष) या प्रभागांचा समावेश आहे. एका उमेदवाराने दोन नामनिर्देशन अर्ज दाखल केल्याची माहितीही समोर आली आहे. अर्जविक्रीचा वेग पाहता येत्या दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल होण्याची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






