spot_img
spot_img
spot_img
spot_img

सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2026

सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2026

 

सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2026 सात वर्षाचे पूर्व नगरसेवकांचे राज्य विसर्जित होऊन भावी नगरसेवकांचे राज्य 2026 मध्ये होणाऱ्या महानगरपालिका निवडणुक मुळे स्थापित होणार आहे तर भावी नगरसेवक हे फक्त या येणाऱ्या टर्मला नगरसेवकच नाही तर त्यांच्या हाती नागरिकांनी दिलेली सत्ता आहे ज्याचा त्यांनी प्रभाग विकासासाठी उपयोग करायचा आहे पण हल्लीचे इकडच्या पक्षातून तिकड उड्या मारायचे आणि तिकडच्या पक्षातून इकडे उड्या मारायचे राजकारण मुळे कोणता पक्ष काम करणार आहे तेच कळत नाही 🙆🏻 तर दुसरीकडे घराणेशाही मुळे कोणी प्रभावी व्यक्तीला व्यक्तिमत्व ज्याला राजकारणातली जाणीव आहे असे वाटतच नाही त्यामुळे नागरिकांची राजकारणाबद्दल विचारसरणी बदलत जात आहे असो. तरी सोलापुरातली नागरिक आहे जागृत आहेत त्यामुळे ते डोळसपणे मतदान करतात आणि योग्य तो उमेदवारच निवडून आणतात 😁.

 

लोकसभा निवडणूक होण्या पूर्वी सोलापुरातील जागेचे रेडी रत्न रेट हे वाढले होते आणि त्यानंतर सोलापुरातील विमान सेवा ही चालू झाली व लगेच आयटी पार्क ची चुनचुन लागली व त्याला देखील मंजुरी मिळाली आहे तर अशा सर्व बाजूंनी सोलापूरच्या प्रगतीला गती मिळाली आहे अशातच 2026 महानगरपालिका निवडणूक या प्रगतीला भर देणारी असो नाहीतर फक्त निवडून येऊन निधी गोळा करत बसणारे नगरसेवक नकोत 🙆🏻🙆🏻🙆🏻🙆🏻

 

सोलापूर हे खूप प्रगती करण्याचा मार्गावर आहे पण इथे फक्त पाण्याची समस्या जास्त महत्त्वाची आहे कारण पाणी हे चार दिवसानंतर येते त्यात देखील फक्त चार तास येते त्यामुळे नागरिकांची पाणी भरण्यासाठी तारांबळ होते व पाणी जास्त भरण्यासाठी मोटर लावून पाणी भरण्याचा उपयोग होतो असे करत असताना सोलापुरातील तीन ते चार जण दगावले आहेत कारण फक्त एकच आहे की पाणी हे चार दिवसानंतर येते आणि ते भरण्यासाठी जीवाची तारांबळ. 🤦🏻

 

दुसरी समस्या आहे सध्याची रस्त्यांची आहे खड्ड्यामध्ये रस्ते आहेत की रस्त्यामध्ये खड्डे आहेत तेच कळत नाही 🤦🏻 वाहतुकीचा कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. अतिक्रमण हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे सरकारी शौचालय देखील पाडून तिथे देखील अतिक्रमण करण्यात आले आहे 🙆🏻 ट्राफिक सिग्नल चे नियोजन नाही फक्त चलन गोळा केले जाते .

 

हद्दवाढ भागामध्ये स्ट्रीट लाईटची समस्या खूप आहे आणि तिथेच डेव्हलपमेंटची कामे भरपूर चालू आहेत काही हद्दवाढ भागांमध्ये डीपी देखील नाहीत त्यामुळे तिथे जर कोणाला बांधकाम काढायचा असेल तर वीज कनेक्शन नसल्यामुळे तेथील बांधकाम रखडले आहेत 🤦🏻

 

असे भरपूर मुद्दे आहेत जे सोलापूरला प्रगतीपथावर घेऊन जाऊ शकतात फक्त योग्य नियोजन उपायोजना आणि तत्पर सेवा आणि योग्य नेतृत्व या सगळ्या गोष्टी सफल करू शकणार आहेत.,👍🏻

 

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!