ग्रामविकास मंत्री श्री. जयकुमारजी गोरे यांच्याशी चर्चा !
हिवाळी अधिवेशन | नागपूर
महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवन परिसरात राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. जयकुमार गोरे यांची भेट झाली. हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत सकारात्मक ठरली.
यावेळी त्यांच्याशी दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध विकासात्मक बाबींवर चर्चा झाली. तसेच, ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना आणि धोरणात्मक निर्णयांवरही विचारविनिमय झाला.
यासोबतच अनेक सहकारी आमदारांशीही अनेक विषयांवर चर्चा झाली. यावेळी सर्वांनी समन्वयातून काम करत राज्याच्या एकूणच प्रगतीला गती देण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






