spot_img
spot_img
spot_img
spot_img

मनपाचे_सार्वजनिक_शौचालय_जेसीबीने_जमीनदोस्त,#७_लाखांचे_नुकसान #दोघांविरुद्ध_गुन्हा_दाखल..

#मनपाचे_सार्वजनिक_शौचालय_जेसीबीने_जमीनदोस्त,#७_लाखांचे_नुकसान

#दोघांविरुद्ध_गुन्हा_दाखल..

 

सोलापूर: सोलापूर महानगरपालिकेच्या ताब्यातील मोक्याच्या जागेवर असलेले सार्वजनिक शौचालय जेसीबीच्या सहाय्याने पाडून टाकल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. मौजे मजरेवाडी, अंबिकानगर भाग-५ नई जिंदगी परिसर येथील ही घटना जागा बळकावण्याच्या उद्देशाने घडली असून, यात मनपाच्या मालमत्तेचे अंदाजे ७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सोलापूर मनपाच्या घनकचरा विभागाने याप्रकरणी दोघा मुख्य आरोपींसह त्यांच्या साथीदारांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. घनकचरा विभागाचे आरोग्य निरीक्षक विश्वास लमुवेल क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अंबिकानगर भाग-५ येथील गुंठेवारी ले-आऊटमधील ‘ओपन स्पेस’ मध्ये हे सार्वजनिक शौचालय मनपातर्फे चालवले जात होते. ही जागा मनपाला सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी मूळ मालकांनी १९९४ मध्ये संमती करारपत्र करून दिली होती.

 

दि. ०३/१२/२०२५ रोजी सायंकाळी ४.०० ते ५.०० वाजेच्या सुमारास, हे शौचालय जेसीबी मशीनच्या मदतीने पाडल्याची माहिती मनपाच्या कनिष्ठ अभियंता महेंद्र बोटे यांना मिळाली. मनपा अधिकाऱ्यांनी तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, नागेश शिवलिंगप्पा कोरे रा. कुमठा नाका, सोलापूर आणि काशिनाथ कुंभार रा. अंबिका नगर भाग-५, सोलापूर व त्यांच्या इतर साथीदारांनी मिळून हे कृत्य केल्याचे समोर आले.

 

तक्रारीनुसार, मनपाच्या ताबे-कब्जे-वहिवाटीतील ही जागा बळकावण्याच्या उद्देशाने आरोपींनी मनपाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता हे सार्वजनिक शौचालय पाडले. या पाडकामामुळे शौचालयाची सीट, भिंत, दरवाजे, शहाबादी फरशी तसेच सेफ्टी टँकपर्यंत जाणारी पाणी व मलवाहिनी पाईपलाईन पूर्णपणे तोडून फोडून टाकण्यात आली. यात अंदाजे ७,००,००० इतके शासकीय मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून जागेवर अनधिकृतपणे ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आरोग्य निरीक्षक विश्वास क्षीरसागर यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पोलीस तक्रार दाखल केली आहे.

 

नागेश शिवलिंगप्पा कोरे, काशिनाथ कुंभार तसेच त्यांचे साथीदार आणि जेसीबी चालक-मालक यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Previous article
Next article

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!