BPMS प्रणालीचे डॅशबोर्ड नागरिकांसाठी सुरू – बांधकाम परवानगी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गती…. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा… आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे.
सोलापूर महानगरपालिकेत बांधकाम परवानगी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यासाठी राबविण्यात आलेल्या Building Permission Management System (BPMS) अंतर्गत आता BPMS डॅशबोर्ड नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला असून या डॅशबोर्डद्वारे बांधकाम परवानगीसंबंधित सर्व माहिती एका क्लिकवर पाहता येणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार हा डॅशबोर्ड सुरू करण्यात आला आहे. बांधकाम परवानगी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, गती आणि नागरिकाभिमुख सेवा प्रदान करण्याचा हा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.
BPMS डॅशबोर्डवर नागरिकांना खालील बाबी स्वतः तपासण्याची सुविधा देण्यात आली आहे:
प्राप्त अर्जांची एकूण संख्या,मंजूर, प्रलंबित व नामंजूर अर्जांची स्थिती,AutoDCR Scrutiny स्थिती,कमतरता/शेरा (Objection) स्थिती,परवानगी मंजुरीसाठी लागलेल्या कालावधीची माहिती,जारी केलेल्या Building Permission, CC व OC ची संख्या,शुल्क वसुली व रेव्हेन्यू माहिती,विभागीय व अधिकारी-निहाय कार्यप्रदर्शन, या डॅशबोर्डमुळे नागरिकांना त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती पारदर्शक स्वरूपात दिसेल. तसेच मंजुरी प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याचे रिअल-टाईम मॉनिटरिंग महापालिका स्तरावर शक्य होणार आहे.नागरिकांसाठी फायदे अर्जाची स्थिती ऑनलाइन पाहण्याची सुविधा,कार्यालयीन फेऱ्यांची बचत,प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता,त्वरित निर्णय व जलद सेवा,महापालिकेचा डिजिटल उपक्रम पुढे सोलापूर महानगरपालिका आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक सेवा ऑनलाइन करण्यासाठी कटिबद्ध आहे. BPMS डॅशबोर्ड सुरू झाल्याने बांधकाम परवानगी प्रक्रियेत मोठी सुधारणा होणार असून नागरिकांना अधिक सक्षम, वेगवान आणि सुलभ सेवा मिळणार आहेत.आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी नागरिकांना या सुविधेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






