spot_img
spot_img
spot_img
spot_img

महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथीनिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून पुतळ्यास पुष्पहार अर्पण

महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथीनिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून पुतळ्यास पुष्पहार अर्पण

 

सोलापूर | २८ नोव्हेंबर २०२५

 

पुरोगामी विचारांचे प्रवर्तक, समाजसुधारक, स्त्रीशिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सुपर मार्केट, जुनी मिल कंपाऊंड समोरील महात्मा फुले यांच्या अर्धपुतळ्यास खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

 

या कार्यक्रमास शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, माजी नगरसेवक विनोद भोसले, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, भीमाशंकर टेकाळे, बसवराज म्हेत्रे, अनिल मस्के, हेमाताई चिंचोलकर, तिरुपती परकीपंडला, सुमन जाधव, करीमुनीसा बागवान, हारून शेख, लखन गायकवाड, संजय गायकवाड, सागर उबाळे, शिवशंकर अंजनालकर, विवेक कन्ना, इलियास शेख, गिरिधर थोरात, शिवाजी साळुंखे, उपेंद्र ठाकर, नागनाथ शावणे, इम्तियाज यादगिर, शोभा बोबे, शुभांगी लिंगराज, मुमताज तांबोळी, संध्या काळे, सलीमा शेख, चंदा काळे, चंद्रकला निजमल्लू, ज्योती गायकवाड, अनिता भालेराव, कोंडनताई काकडे यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

सोलापूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या जाहीरनाम्याचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, खासदार श्री सुनील तटकरे साहेब, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्षा...

*जिल्हा मेळावा मध्ये महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश* 

*जिल्हा मेळावा मध्ये महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश* सोलापूर भारत स्काऊट गाईड यांच्यावतीने कर्मवीर विद्यालय चारे या ठिकाणी जिल्हा स्काऊट गाईड मेळावा संपन्न झाला. या जिल्हा...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!